सोलापूर. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे दर्ग्याच्या बांधकामाप्रसंगी शिवलिंग, भग्न मूर्ती, कोरीव नक्षीकाम असलेले खांब आणि हत्ती आढळून आले आहेत. हे मंदिर यादवकालीन आहे, अशी माहिती सोलापूर विद्यापीठातील पुरातत्त्व शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे एका दर्ग्याचे बांधकाम सुरू असताना मोठे शिवलिंग आढळून आले आहे. यामुळे दर्ग्याचे बांधकाम थांबविण्यात आले असून शिवलिंग पाहण्यासाठी आणि पूजेसाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. आसपासच्या गावातील लोकही शिवलिंग पाहण्यास येत आहेत. शिवपिंडीजवळ ग्रामस्थांनी भगवा ध्वज लावला आहे. बांधकामादरम्यान सापडलेल्या शिवपिंडीची लांबी 4 फूट असून व्यास 2 फूट आणि जाडी एक फूट आहे. पूर्ण शिवलिंग एकाच पाषाणात कोरलेले आहे. गुरूवार दि. 14 जुलै रोजी दर्ग्याच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू होते तेव्हा शिवलिंग आढळून आले.
पूर्ण बातमीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
सोलापूर : दर्ग्याच्या खोदकामाच्या वेळी सापडले यादवकालीन शिवलिंग
No comments:
Post a Comment