आपला देश सेकुलर आहे. सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष. अर्थात धर्मावरून भेदभाव होऊ नये, असा विचार यामागे असावा. मी गेल्या ८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहे.
माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याची योग्य उत्तरेही मला गवसतात. परंतु मला जे उत्तर योग्य वाटते, ते आमच्या क्षेत्रातील नामवंत लोकांना चुकीचे वाटते, असा माझा अनुभव आहे. यामुळे मी काही वेळ संभ्रमित होतो; परंतु मला हृदयापासून वाटते की आपण विचार करतो ते चुकीचे नाही. आणि मी माझ्या मतावर ठाम होतो. समजा मी विचार करताना चुकत असेन तर या विषयातील अधिकारी व्यक्तींनी योग्य मार्गदर्शन करायला नको का ? पण माझ्या बाबतीत असे होत नाही.
या पोस्टच्या सुरुवातीला असलेला फोटो मला मार्मिक वाटला. केवळ धर्माच्या आधाराने भेदभाव करणे मला चुकीचे वाटले. अशाने संकुचित राजकारण साधेल परंतु समाजात दरी निर्माण होईल असे मला वाटले. हा विचार अनेकांपर्यंत पोचावा यासाठी मी हा फोटो facebook वर टाकला. काही प्रतिक्रिया मला या फोटोवर मिळाल्या, त्या प्रतिक्रिया जसेच्या तसे येथे देत आहे. मी खरोखर संभ्रमित झालोय. धर्माच्या आधारे भेदभाव करणे म्हणजे सेक्युलर की याला विरोध करणे म्हणजे सेक्युलर असा प्रश्न माझ्या मनात स्वाभाविकपणे निर्माण झाला आहे. माझ्या दुर्दैवाने facebook वर चर्चा अर्धवट राहिली आहे. परंतु हा प्रश्न मला लाखमोलाचा वाटतो. कारण सेक्युलारीझाम आणि जातीयवादी या बिन्दुन्भोवतीच आपल्या देशाचे सत्ताकारण आणि मीडिया फिरते. असे असताना या विषयावर योग्य चर्चा घडावी असे मला वाटते. म्हणूनच facebook वरील चर्चा येथे दिली आहे. वाचक बंधू तुम्ही तुमचे मत येथे अवश्य मांडा. तर्कशुद्ध चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे.

Arun B.khore siddharam,we never agree with this campaign.we must secular country & society.this is yur agenda,not mine or others.
July 24 at 3:52pm ·
Mukul Kanitkar @ Arun ji, exactly that is the idea. Being secular we should not have reservations in the name of religion. Is'nt it?
July 24 at 6:14pm · · 1 personLoading...
Siddharam Patil @ khore sir and Manoj sir सर, धर्माच्या आधाराने भेदभाव केला जातो. यामुळे सेचुलारीजमला खरा धोका आहे. केवळ धर्माच्या आधाराने सवलत देणे म्हणजे सेकुलर का ? अशा भेदभावामुळे समाजातील दरी वाढते असे आपल्याला वाटत नाही का ? सर, प्लीज मला आपले मत जाणून घ्यायचे आहे. अशा विषयांवर आपल्यासारख्या अधिकारी व्यक्तीने मत द्यावे. योग्य मार्गदर्शन मिळावे या अपेक्षेने tag केला होता. आपली सेकुलर विचारांवर श्रद्धा आहे. आणि त्याची देशाला गरजाही आहे. पण धार्मिक भेदभाव म्हणजे सेकुलर हि प्रतिमा पुसली जावी हि अपेक्षा आहे. अधिक लिहिलो वाटले तर क्षमा असावी.
July 24 at 6:57pm · · 1 person
गैरसोयीच्या प्रश्र्नाना बगल देणे एवढेच संशोधन भारतीय शास्त्रज्ञ करू शकतात.
ReplyDelete