राज्यात गृहमंत्री राष्ट्रवादीचा. राहुल गांधींच्या भेटीने राष्ट्रवादीचे नाक कापले गेले अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांची झाली. परिणामी अजित पवार यांनी वक्तव्य दिले की, 'अण्णा हजारे यांना अटक करून केंद्र सरकारने घोडचूक केली.' मावळचा हा उत्तर रंग. उट्टे काढून झाले. या सा-या प्रकरणाचे सेना-भाजप या पक्षांनी राजकारण केले, असा आरोप सत्ताधारी नेत्यांनी केला. विषय संसदेत गेला. एक दिवस देशाचे सर्वोच्च सभागृह बंद पाडले गेले. सरकारने पोलिस शिपायांना निलंबित करण्याची तत्परता दाखविली. (अर्थात काही दिवसांनी ते पुन्हा नोकरीवर रुजू होतील.) उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशाकरवी या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा सरकारने केली आहे. पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
No comments:
Post a Comment