मुंबई. स्वामी विवेकानंद यांना युथ आयकॉन समजले जाते. विवेकानंद जयंती देशभर युवा दिवस म्हणून साजरा होतो. दि. २५ आणि २६ ऑगस्ट रोजी मुंबईतील रुईया आणि जोशी बेडेकर महाविद्यालात स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञावर राष्ट्रीय परिसंवाद पार पडले. या परिसंवादात युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
भारत जसा आहे तसा त्यावर प्रेम करा. भारतातल्या गरीब, दुखी-पिडीतांवर प्रेम करा. प्रत्येक जीव ईश्वराचेच रूप आहे त्यामुळे माणसातल्या ईश्वराची पूजा करणे सर्वश्रेष्ठ पूजा आहे, असा संदेश स्वामी विवेकानंदांनी दिला. तो विचार आज कृतीत आणण्याची गरज आहे असे प्रतिपादन विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष बी. निवेदिता यांनी केले.
पूर्ण बातमीसाठी खाली क्लिक करा...
No comments:
Post a Comment