Pages

Tuesday, November 1, 2011

मुलं ही केवळ संपत्ती नव्हे तर कर्तव्यही !

कुटुंबाचा आधार आहे गृहस्थी आणि गृहस्थीची धुरा टिकलेली असते दांपत्य जीवनावर. साधारणपणे लोक कुटुंब, गृहस्थी आणि दाम्पत्य हे तीन्ही एकच समजतात. परंतु या तीन्हीत सूक्ष्म अंतर आहे हे मात्र खरे. पती-पत्नीतील वैयक्तीक संबंधांवर आधारित असते ते दांपत्य. पती-पत्नीसोबतच मुलांच्या जबाबदा-याही असतात याला म्हणतात गृहस्थी. यात आर्थिक, मानसिक आणि भौतिक या तीन्ही स्तरांचा समावेश असतो. या सा-यांचे समग्र रूप म्हणजे कुटुंब होय. कुटुंबात पती, पत्नी आणि मुलं यांच्याशिवाय अन्य नात्यांचाही समावेश असतो.
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-gruhasti-and-children-2532794.html
 दांपत्यापासून गृहस्थी जीवनाला सुरूवात होते. आपल्या प्रेम आणि कर्मांवरच संतानांचे संस्कार आणि भवितव्य अवलंबून असते. पती-पत्नींनी फक्त स्वत:साठी जगू नये. संतान किंवा मुलं ही संपत्ती आहे, ती व्यर्थ जाऊ देऊ नका. संस्कार द्या, कर्तव्य भावना निर्माण करा आणि समजूतदार बनवा.
महाभारतातील गांधारी आणि धृतराष्ट्राचे जीवन पाहा. धृतराष्ट्र हे जन्मता अंध होते. त्यांचा विवाह सुंदर गांधारीशी झाला. गांधारीने पाहिले की नवरा अंध आहे तेव्हा तिनेही आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली. पिता अंध होता, मातेने अंधत्व ओढून घेतले होते. दोघेही आपल्या संतानांप्रती असलेल्या कर्तव्यापासून दूर गेले होते. संस्कार आणि शिक्षण देण्याची व्यवस्था त्यांनी सेवकांच्या हाती सोपविली होती. मात-पिता यापैकी कोणीही त्यांच्याकडे पाहणारे नव्हते. परिणामी मुले दुराचारी बनली.
माझ्या मुलांचे काय होईल असा विचार करून गांधारीने जर डोळ्यांवर पट्टी न ओढता लालन पालनाची जबाबदारी घेतली असती तर कदाचित महाभारताचे युद्ध टळले असते. परंतु पती-पत्नींनी केवळ दांपत्य सुख पाहिले. गृहस्थी अर्थात मुलं आणि अन्य कर्तव्ये याकडे त्यांनी लक्ष्य दिले नाही. संताने केवळ संपत्ती नाहीत तर आपले कर्तव्यही आहेत. आपल्या नात्यांत याकडे लक्ष्य दिले नाही तर परिणामांना तोंड द्यावे लागेलच.

No comments:

Post a Comment