सतरा सुरक्षा जवान जखमी
वृत्तसंस्था । श्रीनगर
अनंतनाग, तसेच बारामुल्ला जिल्ह्यात 'स्वतंत्र काश्मीर'ची मागणी करणारे आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या संघर्षात सतरा सुरक्षा जवान जखमी झाले आहेत. 'बकरी ईद'च्या प्रार्थनेनंतर हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
जम्मू काश्मीरमध्ये 'बकरी ईद'ची नमाज अदा केल्यानंतर भारतद्वेष्ट्यांनी मोठ्या प्रमाणावर रॅलीचे आयोजन केले होते. बहुसंख्य तरुणांच्या या रॅलीला नियंत्रणात ठेवताना सुरक्षा दल आणि विरोधक यांच्यात चकमक उडाल्याचे पोलिसांनी सांगितले. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहरातही अशीच चकमक उडाली. ईदगाहमधून बाहेर आल्यानंतर लगेचच देशदोह्यांनी 'स्वतंत्र काश्मीर'च्या घोषणा दिल्या. त्यानंतर जमावाला काबूत आणण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली. पोलीस आणि केंदीय राखीव पोलीस दलाचे सतरा जवान यांमध्ये जखमी झाले.
अनंतनाग जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आर. के. जल्ला, पोलीस अधीक्षक झहीद मलिक आणि पाच इतर सुरक्षा जवान या वेळी जखमी झाले. पोलिसांनी विरोधकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी यावेळी अश्रूधुराचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. 'ईद'च्या पवित्र सणाला मात्र यांमुळे गालबोट लागले
काश्मिर स्वतंत्र करायेच काहीच गरज नाही कारण ते आहेच...
ReplyDeleteमात्र ते दोन तुकडे (हात) जोडायची गरज आहे... म्हणजे कुठले तंत्र ते कळेल!