Pages

Monday, December 5, 2011

देवानंद आणि राजकारण : आणले होते इंदिरा गांधी यांच्या नाकी नऊ

औपचारिकरीत्या राजकारणात पदार्पण करणारा पहिला अभिनेता म्हणून देवानंद यांची नोंद घ्यावी लागेल. स्वत: देवानंद हे राजकारणात अधिक काळ रमले नाहीत, पण त्यांनी फिल्मी हस्तींना राजकारणात उतरण्याचा मार्ग दावला.
१९७७ साली देशात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्यानंतर देवानंद यांनी राजकारणात उतरण्याचा आणि त्यांना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. देवानंद यांनी 'नेशनल पार्टी ऑफ इंडिया'ची स्थापना केली आणि या माध्यमातून राजकीय जीवनाला सुरुवात केली.
http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-indira-gandhi-dev-aanand-emergency-india-sanjay-gandhi-2616888.html?HF=
एनपीआयचे पदाधिकारी आणि देवानंद यांचे कुटुंबीय सांगतात की, देवानंद यांना देशात आणीबाणी लागू करणे पसंद नव्हते. त्यामुळेच त्यांनी इंदिरा गांधी, संजय गांधी आणि त्या काळातील कॉंग्रेस नेत्यांना विरोध केला. त्या काळात इंदिरा गांधी यांच्या विरोधात भूमिका घेणे म्हणजे एक मोठे धाडस होते.
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबध होते. देशकारण ध्यानात घेऊन देवानंद यांनी राजकारणात रुची दाखविली. देशाची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती होणे, त्यांना मान्य नव्हते. देशाची फाळणी ही एक घोडचूक होती, असे त्यांचे म्हणणे होते. 'रोमांसिंग विद लाइफ' या आपल्या आत्मचरित्रात देवानंद यांनी आणीबाणी या विषयावर विस्तृत लिखाण केले आहे.

'इंदिरा म्हणजे भारत आणि भारत म्हणजे इंदिरा' सारख्या घोषणांची आठवण करीत देवानंद यांनी संजय गांधी एक बिघडलेला युवा राजकुमार असल्याचे म्हटले आहे. देवानंद आपल्या आत्मचरित्रात लिहितात, "..मैं जानता हूं कि मैं संजय मंडली के लिए बुरा आदमी बन गया हूं।"
आपल्या आत्मकथेत देवानंद यांनी आणीबाणीची घोर निर्भत्सना केली आहे, तो भाग मुळातून वाचण्यासारखा आहे.
एनपीआय उद्घाटनाची ऐतिहासिक सभा शिवाजी पार्कवर झाली. या सभेला लोकांनी मोठी गर्दी केली होती. देवानंद यांच्याशिवाय एफ. सी. मेहरा आणि जी. पी. सिप्पी आदी हस्तींनीही या सभेला संबोधित केले होते. नंतरच्या काळात सक्रीय राजकारणापासून ते दूर गेले मात्र सामाजिक कार्याशी ते जोडलेले राहिले.

No comments:

Post a Comment