Pages

Friday, December 9, 2011

पाकिस्तानींनाही आहे नरेंद्र मोदींचे आकर्षण

अहमदाबाद - चीन आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एशिया इंटर-डाय-एग्झिबिशनमध्येही नरेंद्र मोदींची लोकप्रियता दिसून आली.
येथे उपस्थित पाकिस्तानी उद्योगपतींमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत उभे राहून फोटो काढण्यासाठी चढाओढ दिसून आली. यावेळी मोदींनी आपल्या कोणत्याही चाहत्याला निराश होऊ दिले नाही. त्यांनी सर्वांना पर्सनल ऑटोग्राफ तर दिलेच, शिवाय त्यांच्यासोबत फोटोही काढून घेतले.

व्हिडीओत पाहा ऑटोग्राफसाठी चढाओढ http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-narendra-modi-pakistan-gujarat-ahamadabad-china-industrialists-2627477.html

अहमदाबाद येथे 'रंगीत रसायन निर्मिती उत्पादनाचे' आशिया खंडातील सर्वात मोठे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात संपूर्ण आशिया खंडातून ४५० उद्योगपतींनी भाग घेतला.
या उद्योगपतींमध्ये पाकिस्तानी उद्योगपतींचाही समावेश होता. यावेळी पाकिस्तानी उद्योगपतींनी मोदी यांना कराची मेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीजचे स्मृतिचिन्ह भेट रुपात दिले. महात्मा गांधी यांनी जुलै १९३४ साली या संस्थेचे भूमिपूजन केले होते.

No comments:

Post a Comment