ज्यूंचा बहिष्कार
ज्यू आणि मुसलमान यांचा संघर्ष इतिहासकाळापासून सुरू आहे. १९४८ मध्ये इस्रायलची निर्मिती झाल्यापासून त्याला एक नवी धार आली आहे. इस्रायल जगाच्या नकाशातून मिटवून टाकण्यासाठी अनेक प्रयत्न प. आशियातील मुस्लिम राष्ट्रांनी एकजुटीने केले. पण ते सर्व फसले. पण वैर मात्र संपले नाही. काही दिवसांपूर्वी, इराणचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू अयातुल्ला अली खामेनी यांनी सर्व मुस्लिमांना आग्रहपूर्वक कळविले की, त्यांनी ज्यू (= यहुदी) लोकांकडून जे जे निर्मित होते किंवा झाले असेल, त्यावर बहिष्कार घालावा.
यावर प्रतिक्रिया म्हणून मेयेर ट्रिंकमॅन या औषधिशास्त्रज्ञाने, मुसलमानांच्या बहिष्काराला मदत (?) करण्याच्या हेतूने खालील गोष्टी सुचविल्या आहेत :-ज्यू आणि मुसलमान यांचा संघर्ष इतिहासकाळापासून सुरू आहे. १९४८ मध्ये इस्रायलची निर्मिती झाल्यापासून त्याला एक नवी धार आली आहे. इस्रायल जगाच्या नकाशातून मिटवून टाकण्यासाठी अनेक प्रयत्न प. आशियातील मुस्लिम राष्ट्रांनी एकजुटीने केले. पण ते सर्व फसले. पण वैर मात्र संपले नाही. काही दिवसांपूर्वी, इराणचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू अयातुल्ला अली खामेनी यांनी सर्व मुस्लिमांना आग्रहपूर्वक कळविले की, त्यांनी ज्यू (= यहुदी) लोकांकडून जे जे निर्मित होते किंवा झाले असेल, त्यावर बहिष्कार घालावा.
१) कोणाही मुसलमानाला उपदंश (सिफलीस) हा रोग झाला असेल, तर 'सलवर्सान' या औषधाचा उपयोग करू नये. कारण या औषधाचा शोध डॉ. एरलिच या ज्यूने लावला होता. त्याने, त्याला खरेच उपदंश रोग झाला आहे, वा नाही याचाही शोध घेऊ नये. कारण 'वॉसर्मन टेस्ट' हाही एका ज्यूचाच शोध आहे. परमा (गनोरिया) हा रोग झालेल्या मुसलमानाने त्या रोगाचे निदान करण्याच्या भानगडीत पडू नये. कारण या रोगाचे निदान करण्याची पद्धत नेइसनेर या ज्यू माणसाने शोधून काढली होती.
२) एखाद्या मुस्लिमाला हृदयरोग झाला असेल, तर त्याने 'डिजिटॅलिस' या औषधाचा वापर करू नये. कारण त्याचा शोध लुडविक ट्रॉबे या ज्यू शास्त्रज्ञाने लावला होता.
३) मुसलमानाला दंतपीडा असेल तर त्याने 'नोव्होकेन'चा उपयोग करू नये. कारण विदाल आणि वेल या नावाच्या दोन ज्यूंचा तो शोध आहे.
४) एखाद्या मुसलमानाला मधुमेह (डायबेटिस)चा आजार झाला असेल, तर त्याने इन्शुलिनचा उपयोग करू नये. कारण तो मिन्कोस्की या ज्यूने लावलेला शोध आहे. तसेच ज्याला डोकेदुखीचा त्रास असेल तर त्याने पायरामिडॉन आणि ऍण्टिपिरीन वर्ज्य करावे. कारण स्पायरो आणि एलेजी या दोन ज्यूंमुळे हा शोध लागला आहे.
५) मुसलमानांना झटके येत असतील तर त्यांनी ते सहन करावे, कारण त्यावरील क्लोरल हायड्रेटचा उपाय ऑस्कर लेब्रिच याने सुचविलेला आहे.
६) अरब मुसलमानांनीही या रीतीनेच आपल्या मनोरुग्णतेबाबत सावध असावे. कारण फ्राईड नावाच्या ज्यूने मानसिक रोगांची चिकित्सा सांगितली आहे.
७) मुसलमान मुलाला घटसर्प (डिप्थेरिया) झाला असेल तर त्याला 'शिक' (Schick) उपचारापासून दूर ठेवावे. कारण त्याचाही शोध बेला शिक या ज्यूनेच लावला होता.
८) मुसलमानांनी, मोठ्या संख्येत मरणाला तयार रहावे, आणि कर्णरोग व मेंदूचे आजार यांच्यावर उपचार करून घेऊ नये. कारण तो उपचार नोबल पारितोषिक विजेता रॉबर्ट बराम या ज्यूने शोधून काढला होता.९) मुसलमानांनी त्यांच्या बालकांना होणार्या लकव्याने तसेच रोगी राहू द्यावे. कारण, जोनास साल्क या ज्यूने पोलियो प्रतिबंधक लस शोधून काढली.
१०) मुस्लिमांनी, वाटल्यास क्षयाची बाधा होऊन मरून जावे, पण 'स्ट्रेप्टोमायसिन' या औषधाचा वापर करू नये. कारण हे चमत्कार घडवून आणणारे औषध झालमन वॅक्समन या ज्यूने शोधले होते.
सारांश असा की, सर्व धर्मनिष्ठ मुसलमानांनी उपदंश, परमा, हृदयरोग, डोकेदुखी, मधुमेह, मानसिक आजार, पोलियो, झटके, क्षय हे सारे रोग अंगीकारावे आणि आपण इस्लामी बहिष्काराच्या आदेशाचे पालन केल्याचा अभिमान धारण करावा.
*** *** ***
योगाचा महिमा
प्राचीन योगशास्त्राला सध्या वैभवाचे दिवस आले आहेत. अनेक पौरस्त्य आणि पाश्चात्त्य देशांमध्ये योगचिकित्सा दिवसेंदिवस लोकप्रिय होऊ लागली आहे. त्याची ही काही उदाहरणे :-
१) आपल्या सैन्यव्यवस्थेशी संबद्ध असलेली 'डिफेन्स रीसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन' (डीआरडीओ) ही संस्था सर्वांना माहीत आहे. तिने, उंच पर्वतश्रेणीवर कार्यरत असलेल्या सैनिकांमध्ये, त्या उंचपणामुळे, जे आजार होतात, त्यावर उपचार म्हणून योगशिक्षणाचा आपल्या अभ्यासक्रमात अंतर्भाव केला आहे. डीआरडीओने, किरगीजीस्थानात, तसेच सियाचीन किंवा नाथू ला यासारख्या दहा हजार फुटांपेक्षा अधिक उंची असलेल्या जागी राहणार्या सैनिकांना योगमार्गाने काही लाभ होतो की नाही, हे पाहण्याचे ठरविले आहे.
सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून, किरगीजीस्थानात डीआरडीओने एक केंद्र स्थापन केले आहे. या उपक्रमात किरगीजीस्थानातील हृदयरोगचिकित्सेचे जे केंद्र आहे, त्याचा सहभाग राहणार आहे. ज्या उंचीवर प्राणवायूची कमतरता असते आणि ज्यामुळे श्वासोच्छ्वास बाधित होतो, त्या उंचीवर योगाचा उपयोग होऊ शकतो काय, याचा शोध हे केंद्र घेणार आहे. त्याचप्रमाणे सामान्य उंचीवर राहणार्या लोकांमध्ये अस्थमा, रक्तवाहिन्यांचे तसेच इतरही रोग यांच्यावर योगाभ्यासाने फायदा होऊ शकतो काय, याचेही परीक्षण केले जाणार आहे. योगात, प्राणायाम हा मुख्य व्यायाम असतो; आणि श्वासोच्छ्वासाशी प्राणवायूचा घनिष्ठ संबंध असल्यामुळे योगचिकित्सेकडे नवे शास्त्रज्ञ वळलेले आहेत.
२) अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठाचे अँडर्सन कॅन्सर सेंटर आणि बंगलोर जवळील स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान यांच्या परस्पर सहयोगाने, योगामुळे कर्करोग (कॅन्सर) बरा होण्याला मदत होऊ शकते काय, यासंबंधी प्रयोग करण्यात आले. त्यांना असे आढळून आले की, स्तनांच्या कर्करोगाने बाधित झालेल्या ज्या स्त्रियांनी किरणोत्सर्गी चिकित्सा पद्धतीचा (रेडिएशन थेरपी) उपचार घेतला, त्यांना योगोपचाराने लाभ झाला आहे. योगशास्त्रात जी आसने, प्राणायामादि ज्या श्वासप्रक्रिया सांगितलेल्या आहेत, त्यांच्या कृतीने त्यांचा थकवा जाण्यात, शारीरिक क्षमता वाढण्यात आणि एकूणच सामान्य निरोगीपणासाठी फायदा झाला आहे. ''योगात मन व शरीर या दोघांचाही व्यायाम केला जातो. त्या योगाच्या ठिकाणी मानसिक व शारीरिक व्याधींच्या निराकरणासाठी साहाय्यभूत होण्याची खूप क्षमता आहे आणि त्या क्षमतेचा, कर्करोग उपचारातही लाभ होतो'', असे त्या विद्यापीठातील एकात्म चिकित्सा अध्ययन केंद्राचे (इंटेग्रेटिव्ह मेडिसिन प्रोग्रॅम) संचालक प्रो. लोरेंझो कोहेन यांनी म्हटले आहे.
३) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ ऍण्ड न्यूरो सायन्सेस (निमहान्स) या संस्थेने, उद्विग्नता (डिप्रेशन), दुभंग मानसिकता (स्किझोफ्रेनिया) या रोगांवर उपचार करताना ४५ मिनिटे योगासने व प्राणायामादि पद्धतीचा उपयोग केला; आणि त्यांना असे आढळून आले की, योगप्रक्रियेने शरीरात जीवशास्त्रीय (बॉयोलॉजिकल) परिवर्तन घडून येते. मोठ्या रोगांच्या बाबतीत अन्य औषधोपचारांबरोबर योगाचा आणि लहानसहान रोगांच्या बाबतीत केवळ योगाचा उपयोग यासंबंधी निमहान्स संस्था अनेक प्रयोग करीत आहे.
४) सुप्रसिद्ध योगगुरू श्री. बी. के. एस. अयंगार हे अलीकडे प्रथमच चीनमध्ये गेले आणि त्यांचे तेथे भावोत्कट स्वागत झाले. सुमारे ३० हजार चिनी लोक योगोपचाराचा फायदा घेत आहेत, असे त्यांना आढळून आले. चीनच्या १७ प्रांतांमधील ५७ शहरात योगशिक्षण केंद्रे आहेत. गुआँगजाऊ शहरात योगाचा अभ्यास करणार्यांची एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या आयोजनात चिनी सरकारचाही सहभाग होता, हे विशेष. त्या सभेत एक हजाराहून अधिक संख्येत योगाभ्यासी लोक उपस्थित होते. बेजिंगमधील एका कार्यक्रमात, ७०० लोकांच्या उपस्थितीत, योगाभ्यास करणार्या चिनी व्यक्तींनी योगासनांची प्रात्यक्षिकेही सादर केली.
५) अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात 'टाईम्स स्क्वेअर' हा प्रसिद्ध चौक आहे. तेथे २१ जून २०११ ला ८००० योगप्रेमी एकत्र आले होते. न्यू यॉर्क शहराची संस्कृती सामान्यत: एकांडी नाही. ती समन्वयाचा पुरस्कार करणारी आहे. तेथे नऊ वर्षांपूर्वी, असाच एक वर्ग आयोजित केला गेला होता, तेव्हा फक्त दोन योगप्रेमी उपस्थित होते. नऊ वर्षांमध्ये ती संख्या ८ हजारावर गेली. न्यू यॉर्कमध्ये अनेक ठिकाणी योग प्रशिक्षण केंद्रे आहेत. कोनी चान आणि डग्लस स्टेवर्ट या दुक्कलीने हा २१ जूनचा कार्यक्रम आयोजित केला होता. सर्वांना प्रवेश नि:शुल्क होता.

विद्यार्थ्यांच्या नमाजावर बंदी
ताजकीस्तान हा आपल्या आशिया खंडातलाच एक देश आहे. त्याच्या पूर्वेकडे चीन, दक्षिणेला अफगानिस्तान, उत्तरेला किरगीजीस्तान आणि पश्चिमेला उजबेकीस्तान आहे. हा सुमारे पाऊण कोटी लोकसंख्येचा देश, सोव्हियत रशियाचा भाग होता. १९९१ साली तो स्वतंत्र झाला. तेथे अध्यक्षीय लोकशाही पद्धतीची राज्यव्यवस्था आहे.
ताजकीस्तानात ८५ टक्के सुन्नी मुसलमान आहेत, तर ७ टक्के शिया मुसलमान आहेत. या देशाच्या सरकारने नुकताच असा कायदा केला आहे की, देशातील शाळांमध्ये विद्यार्थी नमाज पढणार नाहीत. मुलांना न समजणार्या अरबी भाषेतील आयता म्हणायला लावून व त्या आयतांचा आपल्या सोयीप्रमाणे अर्थ लावून, शिक्षक, मुलांना बालपणापासून कट्टर बनवतात, असे तेथील सरकारच्या ध्यानात आले आणि त्यांनी शाळांमधील नमाजाला प्रतिबंध केला.
९० टक्क्यांहून अधिक मुस्लिमांची संख्या असलेल्या देशाच्या सरकारने उचललेले हे पाऊल म्हणजे एक धाडसच म्हटले पाहिजे. कारण इस्लामच्या पाच पायाभूत तत्त्वांपैकी नमाज एक आहे. प्रत्येक मुसलमानाने दिवसातून पाच वेळा नमाज पढला पाहिजे, असा धार्मिक दंडक आहे. एकटाही नमाज पढू शकतो. पण मशिदीत जाऊन सामूहिकतेने नमाज पढला, तर अधिक पुण्य लाभते, अशी तेथे सार्वत्रिक धारणा आहे. ताजकीस्तानचे सरकार म्हणते की, ''विद्यार्थ्यांना नमाज कट्टरवादी बनवितो. या कट्टरवादानेच अल कायदा व तालिबान यासारख्या आतंकवादी संघटनांना जन्म दिला आहे; आणि कट्टरवादाचे शिक्षण देऊन असंतुष्ट, समाजविध्वंसक गट, आपल्या राजकीय उद्दिष्टपूर्तीसाठी 'मजहब'चा उपयोग करतात. ही मंडळी विद्यार्थ्यांच्या मनात अशा प्रकारचे विचार पेरतात की, ज्यामुळे ते पुढे कट्टरवादी बनतील आणि आपल्याच देशासाठी धोका निर्माण करतील.''

राजीव माहात्म्य
थोर पुरुषांच्या नावाने संस्थांची, वस्त्यांची, सडकांची आणि पारितोषिकांची नावे ठेवण्याची पद्धती जगभर रूढ आहे. आपल्याही देशात अनेक गांधीनगरे, टिळकनगरे, विवेकानंद नगरे आहेत. एकेका काळाचा तो महिमा असतो. स्वातंत्र्यानंतर विवेकानंद आणि टिळक यांची नावे मागे पडली. महात्माजींचे नाव पुढे आले. पण नंतर स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचे फलकही झळकू लागले. त्यानंतर श्रीमती इंदिरा गांधी यांचा क्रम लागला. पण विवेकानंद, टिळक, गांधी, नेहरू, इंदिराजी यांना नावांच्या बाबतीत मागे टाकणारी एक व्यक्ती आहे. ती म्हणजे श्रीमती इंदिरा गांधी यांचे पुत्र राजीव गांधी. तसे ते पाचच वर्षे प्रधानमंत्री होते. पण त्यांच्या पत्नी श्रीमती सोनिया गांधी २००४ पासून गेली ७ वर्षे सत्तारूढ दलाच्या सर्वेसर्वा आहेत. त्यांनी आपल्या पतिदेवांची स्मृती अजरामर रहावी यासाठी असंख्य उपक्रमांना, संस्थांना आणि पारितोषिकांना त्यांचे नाव देण्याचा सपाटा सुरू केला. संपूर्ण माहिती अजून प्रकट झाली नाही. पण जेवढी हाती लागली तीवरून खालील सत्ये बाहेर आली.
क्रीडा स्पर्धांसाठी ठेवलेल्या २८ पारितोषिकांमध्ये, २ पं. जवाहरलाल नेहरूंच्या, ३ इंदिरा गांधींच्या आणि उरलेली २३ राजीव गांधींच्या नावावर आहेत. केंद्र सरकारच्या ५२ योजनांमध्ये दोन जवाहरलालजींच्या, २९ इंदिराजींच्या आणि २१ राजीवजींच्या नावाने आहेत. १९ स्टेडियममध्ये जवाहरलालजींच्या नावे १, इंदिराजींच्या नावे ६, तर १२ राजीवजींच्या नावाने आहेत. विश्व विद्यालयीन १७ पुरस्कारांमध्ये पंडितजींच्या नावाने २, इंदिराजींच्या नावाने ६ तर राजीवजींच्या नावाने ८ पुरस्कार आहेत. फेलोशिप/स्कॉलरशिपमध्ये राजीवजींचे नाव ९ ठिकाणी आहे. नवे सर्व दहा दवाखाने राजीव गांधींच्या नावावर आहेत. ही उपलब्ध यादी फक्त गेल्या अठरा वर्षातील आहे आणि तीही अपूर्ण आहे. कुणा संशोधकाने स्वातंत्र्योत्तर काळात सरकारतर्फे दिलेल्या नावांची संपूर्ण सूची तयार केली, तर जनतेचे खूपच प्रबोधन होईल आणि संशोधकालाही कदाचित डॉक्टरेटही मिळू शकेल.

एक अभिनव विवाह निमंत्रण पत्रिका
विवस्वान हेबाळकर या व्यक्तीने ही पत्रिका तयार करून पाठविली आहे.
लग्नपत्रिका
॥ लोकशाही प्रसन्न॥
कोपरापासून दंडवत, विनंती विशेष
आमच्या येथे लोभी व्यापार्यांच्या कृपेने आणि अनिश्चित सरकारच्या आशीर्वादाने
चि. भ्रष्टाचार (स. ग. ळी. क. डे)
(श्री. कु. प्रसिद्ध सारा काळाबाजार यांचे अनिष्ट पुत्र)
यांचा शुभविवाह
चि. सौ. कां. महागाई (सा. मा. न्य. जनता)
(श्री. कु. क. रा. आमटे यांची कन्या)
हिजबरोबर काळ्या रात्री १२ वा. २ मि. एच. एम. टी. मुहूर्तावर मनाविरुद्ध करण्याचे योजिले आहे. आपण सहकुटुंब व मित्रपरिवारासह येऊन वधूवरांच्या कानाखाली आवाज काढावेत, ही नम्र विनंती.
आपले नम्र
श्री. व सौ. मा. रा. जोडे
श्री. व सौ. स. दा. वाटलावे
श्री. व सौ. क. र. बुडवे
श्री. व सौ. भ. रा. खिसे
विवाहस्थळ - जुगार भवन, मटका गल्ली, भाववाढ रोड, सट्टा बाजाराशेजारी, ४२०
टीप- (१) हळदीचे भाव वाढल्यामुळे चुना चालेल.
(२) आपला अहेर आणणे बंधककारक आहे.
समग्र काळाबाजार बंधू
आमच्या दादाच्या लग्नाला यायचं हं.
चि. खोटे, भामटे, चोरटे, लबाडे
...

-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. १३-०८-२०११
नागपूर
दि. १३-०८-२०११