राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून ब्रिगेडियर हेमंत महाजन हे महाराष्ट्राला परिचित आहेत. नक्षलवादाची गंभीर समस्या हे राष्ट्रीय सुरक्षेपुढील एक गंभीर आव्हान आहे. ब्रिगेडियर महाजन यांनी नक्षलवादाच्या समस्येचा सखोल अभ्यास केला आहे. नक्षलवादाचे विविध पैलू आणि तो नियंत्रणात आणण्याचा मार्ग सांगणाऱ्या लेखमालेचा हा दुसरा भाग खास दिव्य मराठीच्या वाचकांसाठी. या विषयावरील लेख आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होतील...