Pages

Saturday, October 1, 2011

अमरसिंग झोपेत काय बडबड करतात ?

चिंता
राज्यसभा खासदार अमरसिंग यांनी सरकारला चिंतित केले आहे. मात्र, सरकारची चिंता अमरसिंगांच्या आजारपणाची नाही. खासदार खरेदी प्रकरणात अमरसिंग तिहारमध्ये असताना जे बोलत होते, त्याने सरकारला चिंतित केले आहे. तिहारमध्ये असताना दिवसा तर अमरसिंग शांत राहात होते, कुणाशी फार बोलत नव्हते. पण, रात्री झोपेत त्यांची जी बडबड होत होती, त्याने सरकारला सतर्क केले आहे. अमरसिंगांची प्रकृती लक्षात घेता त्यांच्या प्रकृतीवर रात्री लक्ष ठेवण्यासाठी तिहार प्रशासनाने एक डॉक्टर तैनात केला होता.