दिव्य मराठी नेटवर्क. एका छोट्याशा घटनेमुळे आज आपल्याजवळ पूर्ण काश्मीर नाहीय. दुर्दैवाने काश्मीरचे महाराजा हरि सिंह आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे संबंध चांगले नव्हते. याची किंमत देशाला मोजावी लागली आणि आजही त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. राजा हरिसिंह यांना शेख अब्दुल्ला यांची कुटिल नीती, स्वार्थी आणि फुटीर वृत्ती माहीत होती. 'क्विट काश्मीर' आंदोलनाच्या आडून शेख अब्दुल्ला हे महाराजा हरिसिंहांना हटवून स्वत: सत्ता मिळवू इच्छित होते. याची हरिसिंहांना कल्पना होती. http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-neharu-and-kasmir-issue-2529050.html