यशस्वी गृहस्थी जीवनाचा आधार सुखी दांपत्य असतो. पती-पत्नींमध्ये एकमेकांप्रती सन्मानाची भावना असेल आणि स्वाभिमानाची मर्यादा न ओलांडण्याचा विवेक असेल तरच दांपत्य जीवन सुखी बनणे शक्य आहे. पती पत्नीशी किंवा पत्नी पतीशी सन्मानाने वागत नसल्यास तिथे परामात्मा राहू शकत नाही. परमात्मा प्रेमाचा भुकेला आहे. ज्या घरात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल तिथेच त्याचा वास असतो.