Pages

Friday, April 6, 2012

एक हात गेला म्हणून काय, दुसरा आहे ना!


सिद्धाराम पाटील | सोलापूर 
एक हात गेला म्हणून काय, दुसरा आहे ना!
ऑटोमोबाईल डिप्लोमाच्या तिस-या वर्षात शिकणा-या 19 वर्षीय उमद्या तरुणाचा उजवा हात बस अपघातात तुटून 20 मीटर लांब जाऊन पडला. एक हात तुटून गेला म्हणून काय झालं, दुसरा हात आहे ना, ही सकारात्मक ऊर्जा त्याला जगण्याचं बळ देत राहिली. त्याने डाव्या हातात कुंचला धरला आणि स्वत:ला पेंटिंगच्या विश्वात झोकून दिलं. अपघातापूर्वी काढत होता त्याहून उजवी चित्रे तो डाव्या हाताने साकारू लागला. या मूर्तीमंत जिद्दीचं नाव आहे झीशान युनूस दुर्गकर.



सोलापूरपासून 100 किलोमीटरवर असणा-या विजापूर येथे झीशानची मावशी राहते. तो नेहमी मावशीकडे बाईकवरून जायचा, पण त्या दिवशी निघतानाच ती पंक्चर झाली म्हणून तो बसने गेला. संध्याकाळी सोलापूरला परतत होता. तेरामैलजवळ (सोलापूरपासून 20 किलोमीटर) बस आली. आता ड्रायव्हरची जागा कंडक्टरने घेतली होती. अचानक मोठा आवाज झाला. काही कळायच्या आत बसमध्ये आरडाओरडा सुरू झाला आणि काही क्षणाने भानावर आलेल्या झीशानच्या ध्यानात आले, खिडकीच्या बाजूचा उजवा हात जागेवर नाही. ट्रकला ओव्हरटेक करताना समोरून आलेल्या ट्रकने घात केला होता.

धार्मिक वृत्तीच्या झीशानच्या मनावर मोठा आघात झाला. रोज सूरे मंझिल पठण करणाएखादा बिझनेस सुरू करण्याचा विचार झीशान सांगतो की, आजोबांची कला माझ्यात आलीय. अपघातापूर्वी काढत होतो त्याहून सुंदर चित्रे आता काढतोय. आॅईल पेंटिंग आणि फिंगर पेंटिंग काढण्यात सोलापुरात आज तरी झीशानचे हात कोणी धरू शकेल, असा दुसरा तरुण चित्रकार दिसत नाही. झीशान आता एखादा बिझनेस सुरू करण्याचा विचार करीत आहे. डाव्या हाताने आपल्याला पॉझिटिव्हनेस दिला, असे त्याने सांगितले.या झीशानला क्षणभर वाटून गेलं की धर्माच्या मार्गाने चालल्याची ही शिक्षा आहे काय, पण हे क्षणभरासाठीच. वाईट स्थितीत मनुष्य कसे वागतो, याची देव परीक्षा घेतो. या विचाराने त्याला जगण्याची शक्ती मिळाली. अपघातानंतर 2 महिने यशोधरा हॉस्पिटलच्या आयसीयूत घालवून तो घरी परतला. झीशानला पेंटिंगचा छंद होता. ज्या हातात कला होती त्या हाताने साथ सोडली होती. पण घरी आल्यानंतर झीशानने एके दिवशी वडिलांना फोन करून ए फोर कागद, स्केच पेन, पेन्सिल आणायला सांगितलं. वडिलांना गलबलून आलं. हा विचार सोडून दे म्हणून वडिलांनी समजावलं. पण झीशानच्या हट्टापुढे त्यांचं काही चाललं नाही. त्याने डाव्या हाताने पेंटिंग काढायला सुरूवात केली आणि अवघ्या दोन तासांत सुंदर चित्र साकारलं. मग मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही.

पुण्यातल्या संचेती हॉस्पिटलमध्ये जाऊन कृत्रिम हात बसवून घेतल्यानंतर झीशान आज अगदी सफाईदारपणे टू व्हीलर आणि फोर व्हीलर चालवतोय. त्याचे आजोबा (नाना) हे उत्तम चित्रकार होते. भागवत चित्रमंदिरमधील पेंटिंग्ज त्याच्या आजोबांनीच बनवल्याची माहिती देऊन झीशान सांगतो की, आजोबांची कला माझ्यात आलीय. अपघातापूर्वी काढत होतो त्याहून सुंदर चित्रे आता काढतोय. ऑईल पेंटिंग आणि फिंगर पेंटिंग काढण्यात सोलापुरात आज तरी झीशानचे हात कोणी धरू शकेल, असा दुसरा तरुण चित्रकार दिसत नाही.

एखादा बिझनेस सुरू करण्याचा विचार

झीशान सांगतो की, आजोबांची कला माझ्यात आलीय. अपघातापूर्वी काढत होतो त्याहून सुंदर चित्रे आता काढतोय. ऑईल पेंटिंग आणि फिंगर पेंटिंग काढण्यात सोलापुरात आज तरी झीशानचे हात कोणी धरू शकेल, असा दुसरा तरुण चित्रकार दिसत नाही. झीशान आता एखादा बिझनेस सुरू करण्याचा विचार करीत आहे. डाव्या हाताने आपल्याला पॉझिटिव्हनेस दिला, असे त्याने सांगितले.

No comments:

Post a Comment