Pages

Thursday, August 9, 2012

बालसंगोपनातील ‘कृष्ण’पैलू


विवेक घळसासी
बालसंगोपनावर कितीतरी उत्तम पुस्तके सध्या उपलब्ध आहेत. आपल्यापोटी जन्माला येणारे किंवा आलेले मूल उत्तम असावे, यासाठी पालकही खूप जागरूक झाले आहेत. आहार, शिक्षण, छंद या विषयांबाबतही पालकांमध्ये दक्षता वाढत आहे. यावर रोज संशोधन होत आहे. डॉ. स्टीफन कार लिऑन या अभ्यासकाने, सतत आठ वर्षे एका प्रश्नाचा अभ्यास केला. ‘ ज्यू लोक एवढे बुद्धिमान का आहेतहा तो प्रश्न होता. हे तर खरेच आहे की विविध क्षेत्रात ज्यू लोकांचे र्शेष्ठत्व निर्विवाद आहे. जगातील उद्योग-व्यवसायातही त्यांचे मोठे स्थान आहे.

पाकमधील हिदू व भारतातील मुसलमान


पाकिस्तानातील अल्पसंख्यकांचा छळ आणि
त्यांचे जबरदस्तीने होणारे धर्मांतर काही नवीन
बाब नाही. परंतु, काही दिवसांपूर्वी ज्याप्रकारे एका हिदू
मुलाच्या मुस्लिम धर्मात होणारया धर्मपरिवर्तनाचे दृश्य थेट
प्रसारित करण्यात आले, त्यावरून पाकिस्तानात
गैरमुस्लिमांची अवस्था कशी असेल, याचा अंदाज करता
येतो. सुनीलकुमार या हिंदू मुलाचे मौलाना मुफ्ती मोहम्मद
अकमलने धर्मांतर केल्यावर त्याचे नावमोहम्मद
अब्दुल्ला' असे ठेवण्यात आले. धर्मांतराचे दृश्यलाईव्ह'
बघणारया कट्टरवादी प्रेक्षकांनी अत्यंत उत्साहित होऊन,
चित्कारत हे नाव सुचविले होते.