Pages

Friday, August 10, 2012

आसाममधील मदतकार्यासाठी आवाहन

सोलापूर । प्रतिनिधी
आसाम राज्यामध्ये झालेल्या हिंसाचारामुळे लक्षावधी देशबांधवांवर निर्वासित होण्याची पाळी आली. विवेकानंद केंद्र कन्याकुमारीने तेथील दलिगांव ब्लॉक भागात सेवाकार्याला सुरुवात केली आहे. दीर्घकाळ चालू शकणा-या या पुनर्वसन कार्यासाठी मुक्तहस्ते देणगी देण्याचे आवाहन केंद्राने केले आहे. देणगीदारांना ‘80 जी’ची सवलत मिळणार आहे. विवेकानंद केंद्र, 165 रेल्वे लाइन्स, होमगार्ड मैदानाजवळ, सोलापूर येथे 16 ऑगस्टपर्यंत सायंकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत रोख / चेक स्वरूपात देणगी स्वीकारली जात आहे. या राष्ट्रीय कार्यात योगदान देण्याचे आवाहन केंद्राचे नगर संचालक दीपक पाटील यांनी केले आहे. संपर्क : आनंद भंडारे 9763439001.