सोलापूर - भगवान शिवशंकराचे निवासस्थान मानले गेलेल्या कैलास पर्वताचे याचि देही दश्रन घडणे कोणत्याही शिवभक्तासाठी परमोच्च आनंदाचा क्षण. सोलापुरात ‘शिवाय नम: अप्पा’ या नावाने ज्यांची ओळख आहे त्या नागनाथ सिद्धप्पा कळंत्रे (वय 67) यांनी कैलास मानस सरोवराची केलेली यात्रा रोमहर्षक आहे. गेल्या 52 वर्षांपासून नित्य नेमाने दिवसातून दोनदा ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दश्रन घेणार्या या शिवभक्ताशी साधलेला हा संवाद.