सोलापूर- प्रक्षोभक आणि समाजविघातक लिखाण करणा-या रझा अकादमी, जमात-ए-इस्लामी हिंद, तेहरिक-ए-हुर्रियत जम्मू-काश्मीर, टू सर्कल डॉट नेट आदी संकेतस्थळांवर आजही बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र, देशभक्ती जागवण्याचे काम करणा-या हिंदू जनजागृती समितीच्या संकेतस्थळावर का बंदी घालण्यात आली, या आशयाची नोटीस केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाला बजावण्यात आली आहे, अशी माहिती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी दै. ‘दिव्य मराठी’ला दिली.