Pages
▼
Tuesday, September 18, 2012
प्रयागमध्ये गंगेचा शोध
काही दिवसांपूर्वी प्रयागला जाणे झाले.
रज्जूभय्यांच्या स्मृतिनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,
त्यामुळे नकार देण्याचे काही कारणच नव्हते. हरिमंगलने संगम आणि
अक्षयवटाच्या दर्शनासोबतच मोठ्या हनुमानाला घेऊन जाण्याचे आश्वासन दिले
होते. सिव्हिल लाईन्समध्ये अनन्दा नामक रज्जूभय्यांचे वडिलोपार्जित घर आहे.
त्यांचे वडील ब्रिटिशकालीन उत्तरप्रदेशचे मुख्य अभियंता होते. त्यांचा
जनसंपर्क दांडगा होता. रज्जूभय्या आणि अशोक सिंघल हे दोघे त्या वेळी
संगीताचे विद्यार्थी होते. शास्त्रीय गायन आणि व्हायोलिन वाजवण्यात या
दोघांचीही रुची होती. तेथेच त्यांची भेट झाली आणि नंतर आपापल्या क्षेत्रात
राष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त करून ते संघाचे प्रचारक झाले. त्यामुळेच
अनन्दा आणि संगम या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी वंदनीय, पूजनीय अशाच होत्या.
दिव्य ध्येयासाठी समर्पित
चर्चचे वास्तव II
चर्चचे वास्तव- १२
दुहेरी लाभ घेणारे मिशनरी मानवतावादी कसे?
चारुदत्त कहू
नागपूर, १२ सप्टेंबर
ख्रिस्ती धर्माचा एकंदरीतच मानवतावादी,
भूतदयावादी चेहरा दृष्टीपुढे आणला तर निरनिराळ्या चर्चमध्ये कार्यरत असलेले
प्रिस्ट, पास्टर, सिस्टर्स, कॅटेचिस्ट, नन्स आदी व्यक्ती पोटाला चिमटा
घेऊन सेवाभावी वृत्तीने आणि कुठल्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता कार्य करीत
असतील, अशी बाह्य जगाची प्रारंभिक धारणा झाल्याशिवाय राहात नाही. तथापि,
वस्तुस्थिती मात्र निराळीच आहे. या सार्या व्यक्ती नोकरदार असून
प्रत्येकाला त्यांचे काम, हुद्दा आणि ज्येष्ठतेनुसार डायोसिसने ठरवून
दिलेले वेतन दिले जाते. डायोशियन प्रिस्टवर पॅरिश चर्चच्या संपूर्ण
देखभालीची आणि संचालनाची जबाबदारी असते. त्यासाठी त्याला योग्य ते वेतन
पॅरिशमधूनच दिले जाते. (यात त्याची बचत, निवृत्ती वेतन, वाहन खर्च,
सुटीकालीन खर्च आणि गरजूंना मदत करावयाच्या निधीचाही समावेश असतो).
चर्चचे वास्तव
चर्चचे वास्तव-१
सेवाभावाच्या नावाने धर्मपरिवर्तनाचा कावेबाजपणा
येशूच्या मागे निघालेलो आम्ही, पोपच्या मागे कधी लागलो कळलंच नाही...
अशी
लोकनाथ यशवंत यांची कविता आहे.प्रभू येशूची दृष्टी आभाळाच्या बापाची होती.
तो म्हणाला, ‘सेवा हाच धर्म’. पोपला मात्र आपलं साम्राज्य वाढवायचं
होतं.धर्म म्हणून सेवा नव्हे तर धर्म वाढविण्याचं शस्त्र म्हणून सेवा... हे
नवं सूत्र आलं. पोपने आणि त्यांच्या छत्रछायेखाली कार्य करणार्या चर्च
आणि चर्चशी संलग्न विभिन्न संस्था-संघटनांनी आपली सत्ता वाढविण्यासाठी
सत्तेचा कसा कावेबाज वापर चालवलाय् याचं दाहक वास्तव मांडणारी वृत्तमालिका
तभात आजपासून...
कुप्प. सी. सुदर्शनजी
अप्रतिहत प्रज्ञेचा धनी
पृथ्वीवर जन्म घेणार्या प्रत्येकच
व्यक्तीला कधी ना कधी मृत्यूला सामोरे जावेच लागते. मात्र, जी व्यक्ती
समाजकार्य, धर्मकार्य आणि राष्ट्रसेवा करताना आपले ऋण समाजबांधवांवर ठेवून
जाते, त्या व्यक्तीचे जाणे लौकिकार्थाने यशस्वी झाले, असे मानले जाते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक कुप्प. सी. सुदर्शनजी यांचा
मृत्यूही त्याच कसोटीवर नोंदला जायला हवा. सुदर्शनजींच्या मृत्यूच्या
निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांच्या मालिकेतील पाचवी
कडी काळाच्या पडद्याआड गेली आहे. त्यांच्या मृत्यूने संघपरिवार आणि
हिंदुत्वाचे मूल्य जाणणारे सारेच देशबांधव शोकसागरात बुडाले आहेत. प्रथम
सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी, तृतीय
सरसंघचालक बाळासाहेब देवरस आणि चतुर्थ सरसंघचालक रज्जूभय्या यांच्या
पावलावर पाऊल टाकत सुदर्शनजी यांनी संघाची प्रगतीची रेषा दशदिशांनाच नव्हे,
तर सातासमुद्रापार पोहोचवली. १० मार्च २००० रोजी नागपुरातील अ. भा.
प्रतिनिधिसभेत रज्जूूभय्या यांनी, त्यांचा उत्तराधिकारी संघाची ध्येयधोरणे
निष्ठेने आणि प्रामाणिकतेने राबविणारा राहील, याची खात्री पटल्यानेच
संघाच्या मुशीतून तयार झालेल्या सुदर्शनजी यांची नियुक्ती केली होती. संघ
ही निव्वळ देशभक्तांचीच संघटना नसून, संघ हा एक सर्वसमावेशक विचार आहे,
जीवन जगण्याची पद्धती आहे, हे पूर्वसूरींनी आखून दिलेले सूत्र सुदर्शनजी
यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत कायम ठेवले. ‘चरैवेति चरैवेति’ या मंत्राचा
त्यांनी अखेरपर्यंत विसर पडू दिला नाही. काल, १५ सप्टेंबरला सकाळी त्यांची
प्राणज्योत मालवण्यापूर्वीही ते सकाळी फिरायला जाऊन आले आणि त्यानंतर
प्राणायाम सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुठल्याही व्यक्तीची
या जीवनाची अखेर इतर कुणालाही; अगदी घरच्या व्यक्तीलाही कुठल्याही प्रकारचा
त्रास न होता व्हावी, अशी इच्छा असते. सुदर्शनजी यांचीही तशीच इच्छा होती
आणि ती त्यांनी जीवनात बालपणापासून केलेल्या तपश्चर्येमुळे पूर्ण झाली.