Pages

Sunday, June 2, 2013

प्रकाश आंबेडकरांचा नातेवाईकच नक्षलवाद्यांचा 'मास्टरमाईंड' !

भास्कर न्यूज नेटवर्क   |  May 30, 2013, 17:22PM IST
नवी दिल्ली- 'दंडकारण्य' या संस्कृत शब्दाचा अर्थ 'जेथे शिक्षा दिली जाते असे जंगल' असा होतो. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा आणि मध्य प्रदेशच्या स‍ीमावर्ती भागात सुमारे 93 हजार किलोमीटर परिसरात दंडकारण्य (नक्षलवादी व्याप्त भाग) पसरले आहे. विशेष म्हणजे या भागात 'समांतर सरकार' चालवणारा 47 वर्षीय मिलिंद तेलतुंबडे याचे  नाव मोठ्या आदराने घेतले जाते. भा‍रिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांच्या बहिणीचे पती आनंद तेलतुंबडे यांचा मिलिंद हा भाऊ आहे. मिलिंद तेलतुंबडे हा महाराष्ट्रातील सीपीआयचा (माओवादी) सचिव असून सध्या तो फरार आहे.

महाराष्‍्‍ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील राजूर येथील एका दलित कुटूंबात मिलिंदचा जन्म झाला होता. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मिलिंद याने वेस्टर्न कोल फील्ड्स मध्ये नोकरीही केली होत‍ी. गडचिरोलीचे पोलिस अधिक्षक सुएज हक यांनी सांगितले की, 80 च्या दशकात मिलिंद हा वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेडच्या मजदूर यूनियनमध्ये सक्रिय झाला  होता. यादरम्यान मिलिंद माओवादी नेताच्याही संपर्कात आला होता. गडचिरोलीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागात नक्षलवाद्यांचं जाळ तयार करण्याचा माओवादी नेत्यांचा हेतू होता.
कोबाड घांडी आणि त्याची पत्नी अनुराधाकडून मिलिंदला नक्षलवादाचा 'बालकडू'
 चंद्रपूर येथे मजदूर आंदोलनात सक्रिय असलेल्या मिलिंद हा नक्सली विचारक अनुराधा आणि तिचा पती कोबाड घांडी यांच्या संपर्कात आला होता. आणि त्यांच्याकडूनच त्याला नक्षलवादाचे बालकडू मिळाले होते. कोबाड सध्या तुरुंगात आहे. साधारण 90 च्या दशकाच्या सुरुवातीला मिलिंद याने शस्त्र हातात घेतले होते. त्यानंतर तोही नक्षलवादी अभियानांमध्ये सक्रिय सहभाग घेऊ लागला होता. त्याकाळात मिलिंद विरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाली होती. चंद्रपुरातील वेस्टर्न कोलफील्डमधील एका कर्मचार्‍यावर गोळ्या झाल्यामुळे मिलिंदवर गुन्हा दाखल करण्‍यात आला होता.
महाराष्‍ट्रासह अनेक राज्यात मिलिंदची सत्ता
महाराष्ट्रातील गडचिरोलीसह छत्तीसगडमधील राजनंदगांव, मध्य प्रदेशातील बालाघाट आणि गुजरातमधील सूरतपर्यंत मिलिंदचा दबदबा आहे. महाराष्ट्र एंटी नक्सल स्क्वॉडचे डीआयजी रवींद्र कदम यांनी सांगितले की, 'माओवादी हे जंगल, ग्रामीण परिसर तसेच शहरात वेगवेगळी रणनीती वापरतात. मिलिंद हा महाराष्ट्रात माओवाद्यांचा प्रचारक म्‍हणून सक्रिय असून विविध राजकिय पक्षांच्या कार्यक्रमास सहकार्य करतो.
200 सैनिकांसाठी केवळ  दोनच टॉयलेट!
गडचिरोलीतील बिनागोंडा हा माओवाद्यांचा गड मानला जातो. लाहेरी पासून अवघ्या 19 किलोमीटरवर आहे. लाहेरी येथे महाराष्‍ट्रातील पोलिसांचे शेवटचे चेकपोस्ट आहे. त्यानंतर घनदाट जंगल सुरू होते. लाहेरी पोस्टवर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लाहेरी पोस्टवर तैनात असलेल्या दोनशे सुरक्षारक्षकांसाठी केवळ दोनच टॉयलेट आहेत. विशेष म्हणजे त्यांना दरवाजे नाहीत. पहाटे चार वाजेपासून सैनिकांच्या रांगा लागतात. तसेच अनेकदा तर सै‍निकांना चांगली जेवणही मिळत नाही.

नक्षलवाद्यांचे 'नवनिर्माण'
महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये पोलिसांनी 'नवनिर्माण' नामक एक कार्यक्रम सुरू केले होते. या माध्यमातून नक्षलवाद्यांना शस्त्र टाकण्याचे आवाहन करून त्यांना मुख्यप्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कामात नक्षलवाद्यांच्या कुटूंबीयांचीही मदत घेतली जाते. आतापर्यंत 35 नक्षलवाद्यांनी शस्त्र टाकून आत्मसमर्पण केले आहे. गडचिरोली पोलिसांनी सी-60 नामक एक विशेष पथक तैनात केले असून यात आदिवासी युवकांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे. या युवकांना छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशेतील ग्रेहाउंड्स फोर्ससोबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.
आंबेडकर कुटूंबीयांना नक्षलवाद्यांबद्दल सहानुभूती!
प्रकाश आंबेडकरांच्या कुटूंबातील सदस्यांना नक्षलवाद्यांसोबत सहानुभूती आहे. परंतु ते हिंसेला समर्थन देत नाहीत. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, एखादी विचारधारा मान्य असणे हा काही गुन्हा नाही, हे तर कोर्टानेही मान्य केले आहे. बाबासाहेब यांचाही हिंसा आणि उग्रवादावर विश्वास नव्हता. लोकशाहीवरच त्यांचा विश्वास होता. समाजातील तळागाळातील व्यक्तीला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'महाराष्ट्र सरकार सध्या द्विधा अवस्थेत आहे. नक्षलवाद्यांसाठी सरकार लाखों रुपये खर्च करते. परंतु शीतल आणि सचिन सारख्या कार्यकर्त्यांना अटक करून एटीएसकडे मरण यातना झेलण्यासाठी पाठवून देते.
 नागपुरात राहणार वायुसेनेचे विशेष युनिट
छत्तीसगढमध्‍ये कॉंग्रेस नेत्‍यांची हत्‍या केल्‍यानंतर आता नक्षलवाद्यांनी मुख्‍यमंत्री रमण सिंह यांच्‍यासह इतर नेते आणि अधिका-यांना ठार मारण्‍याची धमकी दिली आहे. माओवादी कम्‍युनिस्‍ट पार्टीने हल्‍ल्‍याची जबाबदारी घेताना या आशयाचे प्रसिद्धी पत्रक पाठविले आहे. महत्त्वाचे म्‍हणजे, महाराष्‍ट्राचे गृहमत्री आर. आर. पाटील यांनाही माओवाद्यांनी निशाण्‍यावर घेतले आहे. दरम्‍यान, नक्षलवाद्यांचा बिमोड करण्‍यासाठी भारतीय वायुसेनेने नागपुरात युनिट स्‍थापन करण्‍याचा निर्णय घेतला आहे. नक्षलग्रस्‍त भागात कोणत्‍याही प्रकारची मदत करण्‍यास हे युनिट सज्‍ज असेल.
आर. आर. पाटीलही नक्षलवाद्यांच्‍या निशाण्‍यावर
भाजप नेत्‍यांसोबत महाराष्‍ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील हेदेखील माओवाद्यांच्‍या रडारवर आहेत. उसेंडीने पाठविलेल्‍या पत्रकात भाजप नेत्‍यांसोबतच पाटील यांचेही नाव आहे. आर. आर. पाटील यांच्‍याकडे गडविरोलीच्‍या पालकमंत्रीपदाचाही पदभार आहे. त्‍यांनी नक्षलग्रस्‍त भागात काही योजना राबविल्‍या आहेत. त्‍यामुळे त्‍यांनाही निशाण्‍यावर घेण्‍यात आले आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-DEL-nation-builder-ambedkars-kin-is-at-the-forefront-of-the-maoist-fight-4278110-NOR.html?seq=9



No comments:

Post a Comment