Pages

Tuesday, July 30, 2013

...म्हणून ‘दुर्गा’ला हटवलं

मटा ऑनलाइन वृत्त । लखनऊ // Jul 29, 2013, 11.03AM IST
दिल्लीतील ग्रेटर नोएडा येथे एका मशिदीच बांधकाम सुरू होतं. पवित्र रमझानच्या महिन्यात मशिदीचं काम सुरू असल्यानं सगळ्यांनाच आनंद वाटत होता. पण ही मशिद अनधिकृत असल्याचं लक्षात येताच एका महिला आयएएस अधिका-यानं त्या मशिदीचं काम थांबवलं. पण राजकीय नेत्यांनी राजकारण करत त्या महिलेला हटवलं.


http://maharashtratimes.indiatimes.com/nation/ias-officer-heading-anti-sand-mafia-campaign-in-up-suspended/articleshow/21448846.cms?

आयएएस दुर्गा शक्ती नागपाल यांची पहिली पोस्टिंग ग्रेटर नोएडामध्ये झाली. त्या सब-डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट (एसडीएम) म्हणून आल्या होत्या. त्यांची पोस्टिंग होऊन केवळ सहा महिने झाले होते. पण अखिलेश यादव यांच्या सरकारने त्यांना निलंबीत केलं. कारण एकच होतं की त्यांनी रमझानच्या महिन्यात अनधिकृतरित्या बांधल्या जाणा-या मशिदीचं काम थांबवलं. मशिदीचं काम थांबवलं तर मुस्लीम समाजात चुकीचा संदेश जाईल आणि परिस्थिती बिघडेल अशी शक्यता वाटल्यामुळेच दुर्गा यांना निलंबीत केल्याचे अखिलेश यादव यांनी स्पष्ट केलं. मात्र या निर्णयामुळे यूपी आयएएस असोसिएशनने यावर नाराजी व्यक्त केली आहे. आयएएस असोसिएशनचं एक प्रतिनिधी मंडळ सोमवारी यूपीच्या मुख्य सचिवांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा करणार आहे.

दुर्गा नागपाल यांनी ज्या वेगानं काम सुरू केलं होतं त्यामुळे अनेकांच्या अनधिकृत कामांना फटका बसला होता. त्यामुळे अखिलेश यादव सरकारकडून जे उत्तर आले आहे ते यूपीच्या नागरिकांना खरं वाटत नाही. नागपाल यांनी अवैध वाळू माफियांवर कडक कारवाई सुरू केली होती. अखिलेश सरकारवर या वाळू माफियांचा दबाव आहे. त्यामुळे वाळू माफियांच्या दबावाखालीच हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता नागरिकांना वाटते आहे.

नागपाल या २००९ बॅचच्या आएएएस ऑफिसर आहेत. काही आठवड्यापासून त्यांनी अवैधरित्या वाळू उपसा करणा-यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी यमुना नदीतून अवैधरित्या वाळू उपसा करणारे ३०० ट्रक पकडले. इतकेच नाही तर उत्तर प्रदेशातील पश्चिमभागातील यमुना आणि हिंडन नदी वाळू माफियांवर चाप बसवण्यासाठी त्यांनी भरारी पथक स्थापन केली. यामुळे वाळू माफियांचे धाबे दणादणले. त्यांनी धमक्या दिल्यानंतरही दुर्गा नागपाल यांनी आपलं काम थांबवले नाही. अखेर त्यांना निलंबित करण्यात आले.

नागपाल यांच्या निलंबनानंतर विरोधी पक्षाने सत्ताधा-यांवर हल्लाबोल केला आहे. अखिलेश सरकार हे माफियांकडून चालवले जात असल्यानं प्रामाणिक आयएएस अधिका-यांची बदली केली जाते, असा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. दुर्गा नागपाल यांच्या निलंबनामुळे अखिलेश सरकारवर यूपीतील जनता नाराज आहे. अनेकांनी सोशिअल साइटवरून आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हे सरकार माफियांच्या दबावाखाली आहे, असे भाजप नेता कलराज मिश्रा यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment