Pages

Saturday, August 10, 2013

उग्र हिंदुत्वाला मिळतेय उभारी

‘हिंदुत्व म्हणजे प्रत्येक जीवामध्ये ईश्वर मानणे आणि त्यानुसार जगणे. यातून येते सहिष्णुता. हिंदुत्व म्हणजे सर्वसमावेशक जीवनपद्धती. यहुदी आणि पारशी लोकांवर एकांतिक धर्मियांनी अस्तित्वाचे संकट उभे केले तेव्हा त्यांना त्यांच्या धर्मासह आश्रय देणारी विचारधारा म्हणजे हिंदुत्व. आपला धर्म जसा सत्य आहे तसे अन्य धर्मही सत्य आहेत, अशी श्रद्धा असल्यामुळे धर्मांतरण आणि त्यासाठी रक्तपात न करणारा धर्म म्हणजे हिंदू धर्म. परंतु, आज या सहिष्णुतेचा अतिरेक होत आहे. मतांच्या राजकारणामुळे हिंदूंना कोणी वाली उरला नाही. आसाम, काश्मीर, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये हिंदूंची संख्या झपाट्याने कमी होतेय. लव्ह जिहादच्या मार्गाने दरमहा हजारो हिंदू तरुणींना बाटवून धर्मांतरित करण्यात येत आहे. अशा वेळी हिंदूंनी गरजेप्रसंगी शस्त्र घेऊन सुरक्षा लढ्याला सिद्ध झाले पाहिजे,’ असा उग्र विचार घेऊन काम करणाऱ्या  देशभरातील 70 हून अधिक संघटनांच्या प्रमुख नेत्यांचे पाच दिवसांचे अधिवेशन 6 ते 10 जून या काळात गोवा येथे झाले.

अधिवेशनात हाताळले गेलेले विषय आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता देशात उग्र हिंदुत्व रुजू लागल्याचे संकेत मिळत आहेत. ‘हिंदू राष्ट्राच्या 
स्थापनेसाठी अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ असे ब्रीद घेऊनच याचे आयोजन झाले होते. अधिवेशनाचे हे दुसरे वर्ष; पण मिळालेल्या उदंड प्रतिसादाने आयोजक असलेल्या हिंदू जनजागृती समितीचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे आता पुढील वर्षभरात प्रत्येक प्रांतात अशी अधिवेशने घेतली जाणार आहेत.
कडव्या शक्तींची एकजूट
बंगाल टायगर अशी ओळख असलेले हिंदू संहती या संघटनेचे संस्थापक तपन घोष, अकबरुद्दीन ओवेसीच्या जिहादी उपद्व्यापांना हैदराबादमध्ये पायबंद घालण्यात पुढाकार असणारे राजासिंह ठाकूर, कर्नाटकातील श्रीराम सेनेचे सर्वेसर्वा प्रमोद मुतालिक, तामिळनाडूतील हिंदू मक्कल कच्छीचे नेते अर्जुन संपत, पुण्याच्या हिंदू राष्ट्र 
सेनेचे धनंजय देसाई, काश्मिरी हिंदूंच्या न्याय हक्कासाठी लढणा-या पनून काश्मीरचे अध्यक्ष अश्विनीकुमार च्रोंगु, धारच्या भोजशाला मुक्ती लढ्याचे नेतृत्व करणारे नवलकिशोर शर्मा, हिंदू व्हाईसचे संपादक पी. देवमुथ्थू, हिंदू एक्झिस्टन्सचे उपानंद ब्रह्मचारी आदी नेते गोव्याच्या अधिवेशनात तळ ठोकून होते. देशभर विखुरलेल्या या कडव्या शक्तींची एकजूट करण्याचे सारे श्रेय जाते हिंदू जनजागृती समितीला आणि सहिष्णू समाजावर अन्याय करणाºया बेगडी धर्मनिरपेक्षतावाद्यांना.
शेकडो आंदोलने यशस्वी करणारी संस्था
अत्यंत आक्रमक परंतु आध्यात्मिक साधनेची पक्की बैठक हिंदू जनजागृती समितीला आहे. गेल्या आठ-दहा वर्षात या संघटनेने निष्ठावान कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार केली आहे. सनातन संस्थेशी नाळ असलेल्या या संघटनेने देशभ
र विखुरलेल्या आध्यात्मिक शक्तींचे ऐक्य साधत एक हजाराहून अधिक धर्मसभा यशस्वी केल्या. हिंदू देवतांची नग्न चित्रे काढून विटंबना करणाºया एम. एफ. हुसेनविरोधात मोठी चळवळी चालवली. महाराष्ट्रात वादग्रस्त अंधश्रद्धा निर्मूलन कायदा गेली अनेक वर्षे लटकला, त्याचे श्रेय याच संस्थेला जाते. मंदिर अधिग्रहण करण्याचा सरकारचा प्रयत्नही याच संघटनेने हाणून पाडला. गणेशोत्सवातील विकृती दूर करणे, धर्म शिक्षणाची व्यवस्था करणे, लव्ह जिहादविरोधात देशव्यापी जागरण अशा विविध चळवळी हिंदू जनजागृती समितीने लोकशाही मार्गाने प्रभावीरीत्या चालवल्या. ईश्वराची साधना म्हणून हिंदू जागृतीचे कार्य अशी श्रद्धा असलेले शेकडो कार्यकर्ते सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार नियमित साधना करतात. ‘नामजप’ हा साधा सोपा मार्ग आणि रोजच्या रोज आत्मचिंतन यातून अल्पावधीत समितीचे कार्य देशाच्या मोठ्या भागात विस्तारले आहे.
हिंदू जनजागृती समितीची बलस्थाने
हिंदू जनजागृती समितीच्या कार्यात अठरापगड जातींमधील कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे राष्ट्रीय
स्वयंसेवक संघ आणि परिवारातील संघटनांसारखी हेटाळणी होत नाही. आंदोलने आणि चळवळी करताना कायद्याची बाजू सांभाळण्यासाठी अनेक कायदेतज्ज्ञ आणि वकील यांची एक फळी उभी करण्यात आली आहे. स्वत:कडे कमीपणा घेऊन हिंदू हितासाठी काम करणा-या विविध संघटनांमध्ये दुवा म्हणून कार्य करण्याची मानसिकता असलेले शेकडो विनम्र कार्यकर्ते समितीकडे आहेत. आकडेवारी, पुरावे, संदर्भ यांचा उपयोग करून 12 भाषांमधून 200 ग्रंथांच्या 54 लाखांहून अधिक प्रति लोकांपर्यंत गेल्या. याशिवाय अतिशय प्रभावी संकेतस्थळाची निर्मिती केली. रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याबरोबरच सोशल मीडियात प्रसाराची प्रभावी यंत्रणा समितीकडे आहे.
यामुळे मिळतोय प्रतिसाद
कडव्या हिंदुत्व शक्तींना उभा
री मिळणे ही प्रतिक्रियात्मक बाब आहे. हिंदू राष्टÑ स्थापना का आवश्यक आहे, याचे विवेचन करणारे सुमारे एक हजार मुद्दे संकलित केलेले एक अतिशय प्रभावी पुस्तक समितीचे काम सुलभ करत आहे. 1. देशाची फाळणी झाली तेव्हा बांगलादेशात 28 टक्के हिंदू होते. आज 8 टक्के आहेत. पाकिस्तानात 22 टक्के हिंदू होते ते आज 1.7 टक्क्यांवर आले. 2. स्वातंत्र्यापूर्वी भारतात 0.7 टक्के ख्रिश्चन होते. ती संख्या आज 6 टक्के झाली (क्रिप्टो ख्रिश्चनसह). 3. आसाम आणि पश्चिम बंगालमधील काही जिल्ह्यांत 30 वर्षांपूर्वी 11 टक्के असणारी मुस्लिम लोकसंख्या आज 67 टक्के झाली आणि त्या प्रमाणात हिंदूंची संख्या घटली. असे शेकडो मुद्दे विश्वासार्ह पुराव्यानिशी मांडण्यात आले आहेत. नक्षलवाद, धर्मांतर, मूर्तीभंजन, लव्ह जिहाद, गोहत्या, घुसखोरी, आतंकवाद, भ्रष्टाचार, दारिद्य्र, गुन्हेगारी अशा सर्व समस्यांवर हिंदू राष्ट्राची स्थापना करणे हा एकमेव उपाय असल्याचे सांगितले जाते. अशा समस्यांची धग आता सर्वसामान्य बहुजन समाजाला दैनंदिन जीवनात अनुभवास येत आहे.  अशा प्रसंगी विनम्र आणि नि:स्वार्थी कार्यकर्ते अभिनिवेषाशिवाय हे मुद्दे लोकांपर्यंत नेतात. तेव्हा त्याचा स्वाभाविक परिणाम होतो.

No comments:

Post a Comment