Pages
▼
Saturday, March 9, 2013
दीपस्तंभ - होटगी मठ
महाशिवारीत्री निमित्त - वीरतपस्वी मंदिर.
Friday, May 15, 2009

लव्ह जिहादपासून वाचवण्यासाठी प्रबोधन करणाऱ्या – ऍड. अपर्णा रामतीर्थकर
आज
कुठे भगूरला, उद्या पुणे, परवा सांगली… सगळा प्रवास लाल डब्यातून
(एसटीने). गडचिरोली व चंद्रपूर सोडल्यास संपूर्ण महाराष्ट्रात
व्याख्यानांच्या माध्यमातून समाजकार्याचा आणि धर्मकार्याचा यज्ञ त्यांनी
पेटवलाय. बहुतांश सभांना तीन-चार हजार गर्दी ठरलेली. परवा वाशीम
जिल्ह्यातील मंगळूरपीर येथील सभेला 40 हजारांची उपस्थिती होती अन् नाशिक जिल्ह्यातील पिंपळनेरला 30 हजारांची. हे वर्णन आहे 58 वर्षीय ऍड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचं. ‘लव्ह जिहाद’ ही समस्या हळूहळू वाढत असल्याचं
त्यांना जाणवलं. लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींना सावरता सावरता लव्ह
जिहाद थोपवणं, त्याविषयी जनजागृती करणं हे त्यांचं अंगीकृत कार्यच होऊन
गेलं.