गत दोन वर्षांचा अनुभव दिसतो की भारताच्या नवशिक्षित युवकांमध्ये जागृति आली आहे. मोर्चे, आंदोलन उपोषणात तरूणांची संख्या वाढतेच आहे. दूसरीकडे कावड, पदयात्रा, किर्तन, कथा, मंदिरदर्शन अश्या धार्मिक कामातही युवकांचा सहभाग वाढतानांच दिसतो. हे दोन्ही शुभसंकेतच आहेत. पण काय स्वामी विवेकानन्दांना असा जागर अपेक्षित होता ? न पेक्षा काहीही बरे. स्वामीजी म्हणायचेच आळशीपणे पडून राहण्यापेक्षा चोरी करणे केव्हाही बरेच. तमसाधीन युवसमाजापेक्षा आक्रोशित बंडखोर, राजस्तिक कर्मशीला, तरूणाई उत्तमच. पण हयापूढचा विचारा करायला हवा. तारूण्याच्या हया उद्रेकाला सकारात्मक राष्ट्रनिर्माणाची दिशा कशी देता येईल?
Pages
▼
Wednesday, March 20, 2013
श्रध्दा: धगधगती यज्ञशिखा

विराटाची साधना : भारतमातेची उपासना
तारीख: 3/14/2013 11:38:24 AM |
जेसुइट पोप
मल्हार कृष्ण गोखले
रोमन कॅथलिक या ख्रिस्ती संप्रदायाच्या
मुख्य पंथामध्ये अनेक गट आहेत. शतकानुशतकांमध्ये हे गट निर्माण होत गेले
आहेत. फ्रान्सिस्कन किंवा ग्रे फ्रायर्स, डॉमिनिकन्स, कार्मेलाईट किंवा
बेगिंग फ्रायर्स, ऑगस्टिन, थिएटिन्स किंवा कापुचिन्स ही त्यांच्यापैकी काही
नावं. त्यातलाच एक गट म्हणजे जेसुइट किंवा पॉलिस्टिन्स.
पाण्याखालून क्षेपणास्त्र - भारत एकमेव देश
भारत ठरला जगातील एकमेव देश
वृत्तसंस्था / विशाखापट्टनम्, २० मार्च
भारताने आज पाणबुडीवरून मारा करणार्या ‘ब्राह्मोस’ या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरातून यशस्वी चाचणी घेऊन नवा इतिहास रचला आहे. अशा प्रकारच्या क्षेपणास्त्राची पाण्याखालून चाचणी घेणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे. २९० किलोमीटर अंतरापर्यंत अचूक मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.
या क्षेपणास्त्राची ही पहिलीच चाचणी असून ती पूर्णपणे यशस्वी राहिली आहे, अशी माहिती ‘ब्राह्मोस’ प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवथानू पिल्लई यांनी वृत्तसंस्थेला दिली.
जगाच्या पाठीवरील कोणत्याही देशाने आजवर पाण्याच्या खालून सुपरसॉनिक कू्रझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली नाही. चाचणीनंतर या क्षेपणास्त्राने संपूर्ण २९० किलोमीटरचा प्रवास केला. चाचणीच्या काळात क्षेपणास्त्राची कामगिरी अगदी अचूक राहिली. असे त्यांनी सांगितले.
यापूर्वी या क्षेपणास्त्राची जमिनीवरील चाचणीही यशस्वी राहिली होती. आता पाण्याखालूनही यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र लष्करासोबतच भारतीय नौदलाच्या सेवेतही तैनात करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
साभार / तरुण भारत