Pages

Friday, March 29, 2013

पाकिस्तानात चढला होळीचा राजकीय रंग

 मुझफ्फर हुसेन
पाकिस्तान हे कट्टरपंथी इस्लामी राष्ट्र आहे. असे असूनही यंदा तेेथे होळीच्या सणाचा प्रभाव पाहायला मिळाला. आतापर्यंत तेथील मुल्लांनी भारतीय सणांचा तीव्र विरोधच केला आहे. वेळप्रसंगी फतवे काढून अशा सणांवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, पाकिस्तान हा भारतीय उपखंडातील देश असल्यामुळे आजही तेथे भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे.

नव्या पोपना चर्चची पापं थांबवता येतील ?

गेल्या मंगळवारी व्हॅटिकन सिटीत २६६ वे कॅथॉलिक ख्रिश्‍चन धर्मगुरू म्हणून पोप फ्रांसिस यांनी अधिकृत रीत्या पदभार सांभाळला. ते प्रथम लॅटिन अमेरिकन तर आहेतच, शिवाय जवळजवळ एक शतकानंतर युरोपबाहेरचे ते प्रथम पोप ठरले आहेत. पोप पदाची शपथ ग्रहण केल्यानंतर अधिकृतपणे त्यांच्या कार्यकाळाचा प्रारंभ झाला आहे. त्यामुळेच साहजिकच कॅथॉलिक जगतच नव्हे, तर संपूर्ण विश्‍वच त्यांच्याकडे मोठ्या आशेने बघत आहे.