ठरविलेले ध्येय गाठण्यासाठी लागणारा
दृढनिश्चय, त्यासाठीचे प्रयत्न, प्रयत्नातील सातत्य आणि आक्रमक पवित्रा ही
सर्व तंत्रे आत्मसात करून, शत्रूंचा मुकाबला करणारा महान पराक्रमी
राज्यकर्ता म्हणून छत्रपती संभाजी राजे यांचा उल्लेख करावा लागेल. प्रचंड
पराक्रमी छत्रपतींचा पुत्र असल्याकारणाने त्यांच्या कर्तबगारीशी संभाजी
राजांची प्रत्येकाने तुलना केल्यामुळे, मोठी गफलत झालेली दिसून येते.