Pages

Friday, April 5, 2013

धन्यवाद ! पृष्ठदृश्ये एक लाखाच्या पुढे …

वाचक बंधू - भगिनी,
आताच ब्लॉग पृष्ठदृश्यांची संख्या एक लाखाच्या पुढे गेली. या ब्लॉगवर आपण करत असलेल्या प्रेमामुळेच हे शक्य झाले.
खूप धन्यवाद !
आपल्या सूचना, अभिप्राय, मत, प्रतिक्रिया यांचे सदैव स्वागत आहे. 

तुमचाच,
सिद्धाराम भै. पाटील9325306283

रिद्धपुरात मंदिर व मशिदीचा वाद उफाळला

 मंदिरालगतच्या मशिदीमागे असलेल्या याच शासकीय जागेवरून वाद आहे

तभा वृत्तसेवा
शिरजगाव बंड, ३ एप्रिल

महानुभाव पंथियांची काशी मानल्या जाणार्‍या श्री क्षेत्र रिद्धपूरमध्ये दोन धर्मस्थळांच्या वादातून बुधवार, ३ रोजी जातीय तणाव निर्माण झाल्याने प्रचंड तणावाचे वातावरण आहे. संतप्त जमावाने पोलिसांवरही दगडफेक केल्याने त्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

महास्वार्थी व्हा! सेवा करा !!

सार्ध शतीच्या निमित्ताने सर्वत्र स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचा पाठपुरावा होत आहे.आपणही या सदरात नरेंद्रच्या नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या घडणीच्या अद्भुत प्रक्रियेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. युवा मनात हा विचार यायला हवा की, हे कशासाठी? काळ बदलला, परिस्थितीही बदलली. स्वामीजींच्या समाधीलाही १११ वर्षे झाली, मग त्यांच्या आयुष्याचा आज मला काय उपयोग? हा प्रश्‍न उद्धटपणाचा नाही. अत्यंत आवश्यक आहे. जोवर आपण स्वत:चा संबंध या विवेचनाशी जोडत नाही, तोवर हे सगळे निष्फळच. म्हणूनच सेवेच्या तंत्राचा विचार करण्याआधी आज हा विषय काढला.

जर बाबरी मक्का-मदिनात असती तर...

सौदी अरब तो देश आहे, जेथे पैगंबर हजरत मोहम्मद साहाब यांचा जन्म झाला होता. पवित्र मक्केत इस्लाम धर्माचा पाया रचला गेला. हे तेच शहर आहे, जेथे पवित्र कुराण लिहिले गेले. यासाठी हे शहर मुस्लिमांसाठी सर्वांत पवित्र आणि धर्माच्या दृष्टीने सर्वोच्च मानले जाते. दरवर्षी आयोजित होणारी हज यात्रा याच मक्का शहरात होते. यासाठी मक्का हे शहर व्हॅटिकन आणि हरिद्वारसारखेच जगविख्यात आहे. मक्केत घडणार्‍या घटनांना जगाच्या पाठीवर वसलेल्या मुसलमानांसाठी आदर्श म्हणून मानले जाते.

अतिरेक्यांवर विश्वास अन रॉ वर शंका ???????

सेक्युलर दहशतवाद 

दहशतवादी लियाकत शाह
राज्यातील पोलिस आणि गुप्तचर विभाग यांच्यात गोपनीय माहितीचे आदान-प्रदान करणे ‘मॅक’चे प्रमुख कार्य आहे. लियाकतला अटक होण्याच्या अवघ्या काही वेळ आधीच मॅकने एक दूरध्वनी संभाषण टेप केले होते. ज्यात म्हटले होते की, ‘‘तू दिल्लीतील जामा मशीद भागात जा. तेथील एका गेस्ट हाऊसमध्ये तुला सामान मिळेल आणि माणसेही तुला तेथेच भेटतील.’’ हे संभाषण लियाकत आणि पाकिस्तानात बसलेला हिजबुलचा दहशतवादी इरफान यांच्यात झाले होते.