2007 मध्ये शिक्षणासाठी मुंबईत राहायला होतो. सप्टेंबर महिन्यात एकदा
एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी पुण्याला जायचं होतं. दादर स्टेशनवर
आलो. सकाळचे 7.53 वाजले होते. आता मी मुंबईत चांगलाच रुळलो होतो. मला काय
झालं होतं कोणास ठाऊक पण मी उगीच घाई केली. सुटलेली इंद्रायणी गाडी पकडायचा
प्रयत्न केला. हात सुटला आणि पडलो. कमरेखालचा भाग प्लॅटफॉर्म आणि ट्रेन
यामध्ये अडकला.