Pages
▼
Tuesday, June 11, 2013
अखिल भारतीय हिंदू अधिवेशनास गोव्यात प्रारंभ
रामनाथी, गोवा- बहुचर्चित अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला रामनाथी,गोवा येथील रामनाथ देवस्थानाच्या विद्याधिराज सभागृहात गुरुवारी सकाळी मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. 10 जूनपर्यंत हे अधिवेशन चालणार असून पहिल्या दिवशी देशविदेशातील हिंदू संघटनांचे नेते व विचारवंत असे मिळून 300 प्रतिनिधी सहभागी झाले. हिंदू व्हाइसचे संपादक पी. देवमुथ्थू, केरळ हिंदू हेल्पलाईनचे प्रदीश विश्वनाथ, हिंदू संहतीचे तपन घोष, श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांच्यासह विविध हिंदू संघटनांच्या नेत्यांनी गेल्या वर्षभरात हिंदू हितासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. राज्यघटनेत घुसवण्यात आलेले ‘सेक्युलर’ शब्द हटवण्याची आवश्यकता आणि आगामी लोकसभा निवडणुकीत हिंदुत्वनिष्ठांची रणनीती कशी असावी याबद्दल परिसंवादात दीर्घ चर्चा झाली. हिंदुंचे हितरक्षण आणि हिंदू राष्ट्रनिर्मिती या उद्देशाने भरवण्यात येणारे अधिवेशनाचे हे दुसरे वर्ष आहे. अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण http:/www.hindujagruti.org/summit या मार्गिकेवरून सुरू आहे.
हिंदू अधिवेशनाच्या समारोप
सिद्धराम भै. पाटील | Jun 11, 2013, 05:06AM ISTरामनाथी (गोवा) - भारत हे स्वयंभू हिंदू राष्ट्र असून हिंदू तत्त्वज्ञान, हिंदू धर्मशास्त्र, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज यांच्या रक्षणासाठी भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यात यावे, असा एकमुखी ठराव द्वितीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात आज ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम’च्या उद्घोषात संमत झाला. अधिवेशनात सहभागी 21 राज्यांतील हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिका-यांनी भारत हिंदू राष्ट्र होण्यासाठी राष्ट्रव्यापी हिंदू संघटनांचा समान कृती कार्यक्रम निश्चित केला.