नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म आणि शालेय शिक्षण कटक येथे पूर्ण झाले.
ज्यावेळी ते कटकमधील रेविनशा शाळेत दहावी इयत्तेत शिकत होते,
त्यांच्यापेक्षा मोठे असलेले त्यांचे मधले भाऊ लंडनमध्ये शिकत होते.
मॅट्रिक परीक्षेच्या तयारीदरम्यान सुभाषने त्यांना एक पत्र लिहिले, ज्यात
त्यांनी भारताच्या चिंताजनक स्थितीचा उल्लेख केला होता आणि भारताच्या
पुनरुत्थानाविषयी विश्वास प्रकट केला होता. सुभाषचे सर्व पत्रे त्यांच्या
मोठ्या भावाने सांभाळून ठेवली आणि आपल्या मृत्यूच्या आधी त्या पत्रांना
`नेताजी रीसर्च ब्युरो'कडे सोपवले. बांग्लामध्ये लिहिलेल्या एका पत्राचा
अनुवाद आम्ही येथे देत आहोत.