Pages

Monday, May 5, 2014

विवेकानंद केंद्रातर्फे त्र्यंबकेश्‍वरजवळ १६ मेपासून योग शिबिराचे आयोजन

सोलापूर | विवेकानंद केंद्राच्या वतीने त्र्यंबकेश्‍वरजवळ (जि. नाशिक) पिंपळद येथे १६ मे ते ३० मे २०१४ या कालावधीत निवासी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्र्यंबकपासून तीन किलोमीटरवर सह्याद्री डोंगररांगांच्या कुशीत रम्य परिसरात विवेकानंद केंद्राचे प्रशिक्षण केंद्र आहे. त्या ठिकाणी रोज सकाळी ६ ते रात्री ९.३० या वेळेत विविध सत्रांचे आयोजन असेल.


कन्याकुमारी येथे प्रशिक्षण घेतलेले योगशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. १८ ते ५५ वयोगटातील स्त्री पुरुषांना या शिबिरात सहभागी होता येते. नोंदणी व अधिक माहितीसाठी ९४२३९८३२६० या क्रमांकावर किंवा नजिकच्या विवेकानंद केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन योगतज्ज्ञ धनंजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

शिबिराची वैशिष्ट्‌ये
राजयोग, भक्तीयोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग यावर व्याख्याने
योगासने, प्राणायाम, ध्यानक्रिया यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास
आदी शंकराचार्यरचित प्रात:स्मरण, गीतापठण, भजनसंध्या
गटचर्चा, श्रमसंस्कार, खेळ आणि गीते
स्वामी विवेकानंदांच्या जीवनकार्याची ओळख
शुद्ध, सात्विक आहार

No comments:

Post a Comment