Pages

Saturday, August 30, 2014

जपान, मोदी, अबे सिंझो आणि विवेकानंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौय्रावर जात आहेत. त्यावरून एक आठवण २२ ऑगस्ट २००७ ची.
त्या दिवशी जपानचे  पंतप्रधान एबे सिंझो यांनी भारताच्या संसदेसमोर भाषण केले होते.
भाषणाची सुरुवात त्यांनी विवेकानंदांचा संदर्भ देऊन केली.

जपानचे आधुनिक काळातील शिल्पकार ओकाकुरा यांच्या जीवनात विवेकानंद आले होते. विवेकानंदांनी त्यांना मार्गदर्शन केलं होतं असे सांगत दीड तासाच्या भाषणात अनेकदा विवेकानंद विचारांचा धागा पकडत ऐतिहासिक भाषण केलं.
ते भाषण वाचलं की ध्यानात येतं की जपानचे पंतप्रधान सिंझो हे भारत आणि विवेकानंद यांचे किती मोठे अभ्यासक व भारतीय तत्वज्ञानाचे चाहते आहेत.
सिंझो आणि मोदी यांची मैत्री हा चर्चेचा विषय झाला आहे.
पण दोघेही विवेकानंद आणि भारतीय तत्वज्ञान अर्थात हिंदुत्वाचे चाहते आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानप्रेमी आहेत, हे महत्वाचे आहे.
भारतासाठी ही बाब खूपच आश्वासक आहे.
जपानच्या पंतप्रधानांचे ते भाषण नक्की वाचा.
MOFA: Speech by H.E. Mr. Shinzo Abe, Prime Minister of Japan, at the Parliament of the Republic of India "Confluence of the Two Seas" (August 22, 2007) - http://www.mofa.go.jp/region/asia-paci/pmv0708/speech-2.html
# नोंदी सिद्धारामच्या

No comments:

Post a Comment