Pages

Tuesday, November 18, 2014

द्रष्टा - ज्याने दगडात ओतले प्राण

एकनाथजी रानडे

सर्व स्तरातून प्रचंड विरोध होऊनही स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभारणीत संपूर्ण देशाचे सहकार्य मिळवणारी व्यक्ती होती माननीय एकनाथ रानडे. १९ नोव्हेंबर २०१४ पासून माननीय एकनाथजी रानडे जन्मशती वर्षाला सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने…
स्वामी विवेकानंदांचे स्मारक



भारताच्या दक्षिण टोकाला कन्याकुमारी येथे समुद्रातील श्रीपाद शिलेवर उभे असलेले स्वामी विवेकानंदांचे भव्य स्मारक आता सार्या देशाला माहीत झाले आहे. तीन सागरांच्या संगमस्थळी असलेल्या या स्मारकाला दरमहा दीड लाखाहून अधिक लोक भेट देतात. सर्व स्तरातून प्रचंड विरोध होऊनही या स्मारकाच्या उभारणीत संपूर्ण देशाचे सहकार्य मिळवणारी व्यक्ती होती माननीय एकनाथ रानडे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे उद्घाटन नवी दिल्ली येथे नुकतेच, ९ नोव्हेंबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.