शेकडो वैशिष्ट्यपूर्ण रूपं असलेला गणपती हिंदू धर्मातील पंथोपपंथांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.
गणपती हा लहान मुलांचा लाडका आणि आवडता देव आहे. तामिळनाडूत गणपतीला पिल्लयार अर्थात मुलांचा देव म्हणतात. दशदिशांत आनंदाची उधळण करणारा गणपती
देवांचा सेनापती, दीनदुबळ्यांचा सांगती, साहित्याचा ज्ञाता, केलेचा
उद्गाता, भक्तांचा रक्षणकर्ता आहे. रणांगणापासून रणभूमीपर्यंत अग्रस्थानी
राहणारा तो नेता आहे. म्हणूनच हिंदू धर्माच्या मुख्य शाखा असणाऱ्या शैव,
वैष्णव, जैन, बौद्ध आदी विविध पंथांमध्ये गणपती पूजला जातो.