Pages
▼
Saturday, March 21, 2015
गुढीपाडवा आणि वैज्ञानिक कालगणना
काळासंबंधी आपण कसा विचार करतो त्याचा आपल्या जीवनशैलीवरही परिणाम होतो. आज सारे विश्व पर्यावरणाच्या समस्यांनी ग्रासले गेले आहे. आपण जर या समस्येच्या मुळाशी जाऊन पाहिले तर असे दिसून येईल की, याची मूळ कारणे पाश्चिमात्य विचारांत आहेत. ती मंडळी काळाला एकरेषीय समजतात. त्यामुळे जीवन केवळ मर्यादित वेळेपर्यंतच मानले जाते. यामुळे जेवढे अधिक भोगता येईल तेवढे भोगण्याची वृत्ती निर्माण होते. परिणामी सृष्टीचे शोषण होते.
Friday, March 6, 2015
इराणमध्ये बुरख्याविरुद्ध जिहाद
![]() |
My Stealthy Freedom |
पद्मश्री मुजफ्फर हुसेन यांचा दिव्य मराठीतील लेख
तिने निवडलेला मार्ग अतिशय वेगळा आणि प्रभावी होता. तिने फेसबुकवर एक पेज बनवले. इराणी महिलांनी बुरखा किंवा कोणत्याही प्रकारचा पडदा न वापरता काढलेले छायाचित्र त्या पेजवर पेस्ट करण्याचे आवाहन केले. हे आवाहन यायचा अवकाश महिलांनी बुरख्याशिवायची छायाचित्रे धडाक्याने अपलोड केली. मौलाना किंवा इस्लामी कायद्याची भीती न बाळगता पोस्ट केलेल्या छायाचित्रांची संख्या तब्बल ७ लाख ६० हजारांहून अधिक होती.
![]() |
मसीह अलीनिजाद |
Tuesday, March 3, 2015
संवादाची शक्ती - एक चिंतन
विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे राष्ट्रीय अध्यक्ष व विचारवंत पी. परमेश्वरन् यांचा लेख...
जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावर एखाद्याशी चर्चा करता तेव्हा ती तीन प्रकारे करता येते. वाद, जल्प आणि वितंड हे ते तीन प्रकार आहेत. किती सुरेख विभागणी आहे ही. ‘वादा’ मध्ये सत्य शोधणे हा तुमचा हेतु असतो. सत्यशोधनाच्या हेतुने तुम्ही दुसर्याशी चर्चा करीत असता या चर्चेच्या वेळी तुम्ही शांत, संयमी असता. तुमच्याकडून वाक्ताडन होत नाही. चर्चाही गरमागरम नसते. अशा चर्चेला वाद असे म्हणतात.