पाणी, ऊर्जा साधने यांची काळजी
घेतल्यास सुटतील अनेक समस्या
विवेकानंद केंद्र पर्यावरण मंडळाच्या कार्यक्रमात
अरविंद जोशी यांचे प्रतिपादन
सोलापूर प्रतिनिधी
पाणी,ऊर्जा
साधने आणि जमीन या तीन गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली तर पर्यावरणाच्या
अनेक समस्या सुटतील. त्यासाठी दैनंदिन जीवनात छाेट्या छोट्या गोष्टी
करतानाही पर्यावरणाचा विचार मनात जागता ठेवला पाहिजे, असे मत ज्येष्ठ
पत्रकार अरविंद जोशी यांनी व्यक्त केले. रविवारी सायंकाळी विवेकानंद
केंद्रात श्री. जोशी यांचे दैनंदिन पर्यावरण या विषयावर व्याख्यान झाले.
केंद्राच्या पर्यावरण मंडळातर्फे घेतलेल्या पर्यावरणावरील घोषवाक्य निबंध
स्पर्धेचा परितोषिक वितरण सोहळा यावेळी झाला.
पर्यावरण मंडळाचे प्रमुख
अजित ओक, ज्येष्ठ कार्यकर्ते वल्लभदास गोयदानी, उद्योजक दीपक पाटील आदी
व्यासपीठावर उपस्थित होते. केशव कोलकुंदी यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमप्रमुख शिवानंद पाटील यांनी प्रस्तावना केली. सागर सुरवसे यांनी
आभार मानले.
निबंध,घोषवाक्य स्पर्धेतील विजेते
निबंधस्पर्धेतील
प्रथमेश पुराणिक (प्रथम), राजीव दुधगुंडी (द्वितीय), प्रणोती रायखेलकर
प्रा. मधुकर देवळालकर (तृतीय) आणि घोषवाक्य स्पर्धेतील सौ. विजया बिराजदार
(प्रथम), आनंद घोडके (द्वितीय) आणि बलभीम सोनटक्के (तृतीय) यांना पारितोषिक
देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेत सहभागी सर्वांना "गतिमान संतुलन' हे
पर्यावरण विषयावरील मासिक वर्षभर पाठवले जाणार आहे.
No comments:
Post a Comment