काही दिवसांपूर्वी सोलापुरात स्त्री प्रसूती तज्ज्ञांची महाराष्ट्र राज्य परिषद झाली. राज्यातून १२०० तज्ज्ञ डाॅक्टर्स सहभागी होते. सोलापूरच्या डाॅ. शोभा शाह यांनी परिषदेत गरोदरपणातील योगाभ्यास आणि ओंकार साधनावर शोधप्रबंध सादर केला आणि त्याला उत्कृष्ट शोधनिबंधाचा पुरस्कार मिळाला.
सोलापूरच्याविवेकानंदकेंद्रात डाॅ. शोभा शाह आणि त्यांचे सहकारी गेले १६ वर्षांपासून मातृत्त्वयोग हा उपक्रम घेत आहेत. त्यात आजवर ८५० गर्भवती सहभागी झाल्या. यातील १०८ महिलांचा अभ्यास करून डाॅ. शाह यांनी संशोधन प्रबंध सिद्ध केला.
मुलाला जन्म देणे म्हणजे एकप्रकारे स्त्रीचा पुनर्जन्मच असतो. बाळंतपणात येणाऱ्या कळा या स्त्रीने सोसल्याच पाहिजेत, गर्भवती हिंडती फिरती असावी, जात्यावर दळण दळावे, घरात वाकून काम करावे तेवढे बाळंतपण सोपे जाते अशा प्रकारची वाक्ये गर्भवतीला ऐकावीच लागतात. मात्र मूल जन्माला घालण्याचा क्षण हा स्त्रीसाठी आनंदसोहळा असला पाहिजे. तिने तो एन्जाॅय केला पाहिजे. हा अनुभव अनेक स्त्रियांनी घेतल्याचे प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डाॅ. शाह यांनी सांगितले.
१९९९ मध्ये या मातृत्त्वयोग उपक्रमाला सुरुवात झाली. त्यासाठी सोलापूर केंद्रातील डाॅ. शहा आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांनी बंगळूरू येथील स्वामी विवेकानंद योग अनुसंधान केंद्रातून प्रशिक्षण घेतले. गर्भवतींना आवश्यक अशी आसने योगाभ्यास तयार केला. शास्त्रीय दृष्टिकोन आणि वैद्यकिय ज्ञान यामुळे हा योगाभ्यास परिपूर्ण झाला. दर शनिवारी सायंकाळी ते ६.३० या वेळेत मातृत्त्व योगाची साधना चालते. इतर दिवशी या महिला घरी योगसाधना करतात.
ताण कमी होऊन मानसिक बळ मिळाले
श्रुतीकुलकर्णी, सोलापूर
मीगरोदरपणात नऊ महिने विवेकानंद केंद्रात जात होते. तेथील व्याख्याने, माहिती, शरीर रचनेची माहिती याचा खूप उपयोग झाला. दर शनिवारी आसने आम्हाला शिकवली जात. आठवडाभर आम्ही त्याचा घरी सराव करत. मानसिक बळ मिळाले. खूप प्रसन्न वाटायचे.
बाळंतपणासाठी चार तास वेळ कमी लागला
डाॅ.यशस्विनी कराडकर, पुणे
प्राणायामामुळेमला बाळंतपणासाठी साधारण चार तास वेळ कमी लागला, असे डाॅक्टरांनी सांगितले. बाळंतपणानंतर मी याचा सराव सुरू ठेवलेला आहे. त्यामुळे नंतर होणारी सांधेदुखी, वजन वाढणे असा त्रास झाला नाही. मुलगी अडीच वर्षांची असून हुशार आहे.
योगाभ्यासाने होणारे फायदेडाॅ. शोभा शाह, प्रसूतिशास्त्र तज्ञबाळ जन्मल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत स्तनपान करण्याचे प्रमाण वाढले.
बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही, बाळाचे वजन वाढते.
गर्भवतीच्या मनाची शरीराची तयारी होते, नाॅर्मल डिलिव्हरीचे प्रमाण वाढते.
ओंकारामुळे गर्भवतीच्या मनावरील ताण कमी होतो, मनातील भीती जाते.
श्वसनाच्या व्यायामाचे फायदे
गरोदरपणातशिकवण्यात येणाऱ्या श्वसनाच्या व्यायामाने, प्राणायामामुळे त्यांच्या फुफ्फुसांची क्षमता विकसित होते. हस्त ताण श्वसन, घोट्याला ताण देऊन श्वसन करणे शिकवले जाते. यामुळे जास्त प्राणवायू घेतला जातो. छातीचे पेक्टोरोल मसल्स मोकळे होतात. रक्तपुरवठा सुरळीत होतो. यामुळे बाळास स्तनपान करण्याची प्रक्रिया सहज होते. श्वास रोखून धरण्याची क्षमता वाढते. या सरावामुळे बाळंतपणातील दुसऱ्या टप्प्याची वेळ कमी होते. दोन कळांच्या मध्ये शवासन केल्यामुळे पुढच्या कळांना फायदा होतो. शरीर थकत नाही.
या केंद्रात येणाऱ्या महिलांचा सर्व्हे डाॅ. शाह यांनी केला. बाळंतपण आम्हाला अतिशय आनंद देणारे ठरले, आम्ही बाळंतपण एन्जाॅय केले, अशा शब्दात महिलांनी प्रतिक्रिया दिल्या.
बाळंतपणाच्या वेळी येणाऱ्या कळा जास्त वेदनादायी ठरता त्या आपल्या मुलाच्या जन्मासाठी फायदेशीर असल्याचे त्यांनी अनुभवले. हे सर्व अनुभव गर्भवतींना आले ते योगाभ्यासाने.
गरोदरपणातील पाठ दुखणे, मळमळ होणे, पायात गोळे येणे, अशक्तपणा वाटणे, रक्तदाब वाढणे अशा तक्रारी कमी होतात. माता मृत्यू माता आजारपण याचे प्रमाण कमी होते.
गर्भवतीने केलेल्या योगाभ्यासाने होणारे अपत्य शांत असते. तसेच ओंकार साधनेने मूल रडत असेल तर शांत होते असाही काही जणींना अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. मातांनाही मन:शांती मिळते.
आसनांमुळे होणारे फायदे
आसनांचेप्रशिक्षण दिले जाते. तसेच त्याचा सराव करून घेतला जातो. यामुळे पाठीच्या कण्याचे स्नायू, मांडीचे स्नायू, पोटाचे स्नायू यांची ताकद वाढते. वेदना सहन करण्याची क्षमता वाढते. बाळंतपणातील कळांच्या वेदना सहन करून सुलभ प्रसूतीसाठी मदत हाेते. वेदनांचा परिणाम शरीरावर मनावर होत नाही. त्यामुळे शरीर सैल सोडले जाते. मनात भीती नसल्याने शरीर त्या प्रक्रियेस साथ देते. परिणामी बाळंतपण सोपे होते.
माधवी कुलकर्णी, सोलापूर
दिव्य मराठी, सोलापूर
२१ जून २०१५
No comments:
Post a Comment