काळासंबंधी
आपण कसा विचार करतो त्याचा
आपल्या जीवनशैलीवरही परिणाम
होतो. आज
सारे विश्व पर्यावरणाच्या
समस्यांनी ग्रासले गेले आहे.
आपण जर या
समस्येच्या मुळाशी जाऊन पाहिले
तर असे दिसून येईल की,
याची मूळ कारणे
पाश्चिमात्य विचारांत आहेत.
ती मंडळी काळाला
एकरेषीय समजतात. त्यामुळे
जीवन केवळ मर्यादित वेळेपर्यंतच
मानले जाते. यामुळे
जेवढे अधिक भोगता येईल तेवढे
भोगण्याची वृत्ती निर्माण
होते. परिणामी
सृष्टीचे शोषण होते.