व्हीआयएफच्या देखण्या सभागृहात 3
आणि 4 सप्टेंबर रोजी जागतिक हिंदू-बौध्द संमेलन पार पडले. विवेकानंद
इंटरनॅशनल फाउंडेशन, जपानची थिंक टँक समजली जाणारी टोकियो फाउंडेशन आणि
जगभरातील बौध्दांची सर्वोच्च संस्था इंटरनॅशनल बुध्दिस्ट कॉन्फिडरेशन या
जागतिक स्तरावर नावलौकिक असलेल्या तीन संस्थांनी मिळून या संमेलनाचे आयोजन
केले होते. केवळ माझाच धर्म खरा म्हणणाऱ्या धर्मांचा अनुभव घेतलेल्या
जगासाठी हा विचार नवीन आणि आश्वासक होता. हा विश्वबंधुत्वाचा विचार आजही
एकांतिक धर्मीयांनी स्वीकारलेला नाही. धर्मांतरणे घडवून आणण्यासाठी ते
कोणत्याही थराला चालले आहेत. त्यामुळे जगातील संघर्ष टाळण्यासाठी एका सशक्त
पुढाकाराची गरज होती. जागतिक हिंदू-बौध्द संमेलनाकडे या पार्श्वभूमीवर
पाहिले पाहिजे..