ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांचे शुक्रवारी (६ नोव्हेंबर) रात्री निधन झाले.
मृत्यूसमयी ते ६६ वर्षांचे होते. गेल्या तीन दिवसांपासून अश्विनी रुग्णालयात
त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. अंत्ययात्रा ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या
ओंकार सोसायटी (होटगी रोड) येथील राहत्या घरापासून निघणार आहे. सामाजिक
कार्यकर्त्या अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे ते पती होत.
|