प्रिय भारतीय मित्रा,
हे राष्ट्र संविधानाची निर्मिती होण्याआधीपासून
अस्तित्वात आहे, हे तुला माहीत नाही काय?
भारत १९४७ ला स्वतंत्र झाला याचाच अर्थ
तो त्यापूर्वीही होता.
२३ टक्के मुसलमानांसाठी
भारतभूमी तोडून देण्यात आली.
उर्वरित भारताने तरीही स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणून घोषित केले, त्याचे कारण हिंदू हे स्वभावत:च धर्मनिरपेक्ष आहेत.
जामा मशिदीच्या कट्टर इमामानेही मान्य केले की भारतातील हिंदूंमुळेच हा देश धर्मनिरपेक्ष आहे.
या देशातील लोकांनी घटना तयार केलीय,
त्यामुळे ती धर्मनिरपेक्ष आहे.
घटनेत हिंदुस्थान शब्द नाही म्हणून
काही फरक पडत नाही.
भारत, इंडिया, हिंदुस्थान, जंबुद्विप ही नावे समानार्थी आहेत.
हिंदू म्हणवून घेण्याची लाज कशाला बाळगतो?
अभिमानाने म्हण मी हिंदू आहे.
हिंदू हा देशभक्त आहे.
तो या भूमीचा पुत्र आहे.
आणि हो हे ही खरेच आहे की
काही बुद्धीजीवींना आपण हिंदू असल्याची लाज वाटते,
ते सतत जिहादी प्रव्रुत्तीची तळी उचलतात,
त्यांच्यावर एकांतिक रिलीजन्सचा प्रभाव असतो,
हे जिहादींपेक्षा अधिक घातक असतात,
अभ्यासू पत्रकार तुफेल अहमद यांनी
अशा देशबुडव्या हिंदूंचे वर्णन
"अब्राह्मिक हिंदू" या शब्दावलीत केले आहे.
अब्राह्मिक हिंदू हे स्वत:ला
धर्मनिरपेक्ष अथवा काम्रेड / डावे म्हणवून घेत असतात.
हे लोक मुस्लिमांमधे सुधारणावादी नेत्रुत्व निर्माण होण्यातील सर्वात मोठा अडथळा आहे.
स्वामी विवेकानंद यांनी शिकागोच्या जगप्रसिद्ध भाषणात सांगितले होते की, "सनातन हिंदू धर्म हा नाना धर्मांचे उगमस्थान आहे."
भारतवर्षात उगम पावलेले सर्व पंथ व संप्रदाय (रिलीजन्स) मिळून हिंदू धर्म बनला आहे. हा विशाल विचार नाकारणारे अब्राह्मिक हिंदू हे स्वत:ला उदार म्हणवतात आणि भारतात उगम पावलेल्या सर्व पंथांना ( उदा. जैन, बौद्ध, लिंगायत आदी) एका सूत्रात बांधणार्या हिंदुत्वाला संकुचित ठरवण्यासाठी आटापिटा करतात.
ब्रह्मदेश तोडून तेथे इस्लामस्थान करण्यासाठी रक्तपात करणारे रोहिंग्या मुसलमान निर्वासित बनतात तेव्हा घळाघळा पाझरणारे सेकुलरवादी ह्रुदय काश्मीरात हिंदू निर्वासित होतात तेव्हा पाषाण बनून जाते.
रोहिंग्या मुस्लिमांना काश्मीरात वसवण्याचे समर्थन अब्राह्मिक हिंदू करतात. पण तेथे निर्वासित हिंदूंना वसवल्यास काश्मीरियतला धोका पोचतो असे सांगून कोकलणारेही हेच असतात.
जेथून हिंदू कमी झाला तो भाग देशापासून तुटला
हे त्यांना माहित नाही असे थोडेच आहे.
काश्मीर, नागालैंडमधे आज ८० टक्के हिंदू असते तर तेथे देशद्रोही डोके वर काढले असते काय?
विवेकानंदांनी १०० वर्षांपूर्वी शिकागो भाषणातून जगाला सांगितलं, "मी अशा धर्माचा प्रतिनिधी आहे की जो म्हणतो, माझा धर्म सत्य आहे तसे तुमचेही धर्म सत्य आहेत."
जगात एवढा उदार धर्म कुठे आहे काय? मग हिंदूस्थान, हिंदू शब्द उच्चारताना लाज कसली?
अभिमानाने म्हण की हा देश हिंदुस्थान आहे. याला भारत, जंबुद्विप, इंडिया अशी अनेक नावे आहेत.
- एक भारतीय
No comments:
Post a Comment