गेल्या वर्षभरात सर्व भारतीय एकाच मुद्दयावर एकवटलेले दिसले, तो मुद्दा म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार रोखणे. असे असले तरी भ्रष्टाचाराला जबाबदार कोण या प्रश्नाचे उत्तर मात्र अध्यापही धूसर आहे. अस्पष्ट आहे. तसे पाहिले तर राजकारणी आणि नोकरशहांवर खापर फोडून स्वत:ला मोकळे करणे तसे सोपे आहे. परंतु आपले काम करून घेण्यासाठी लाच देणे ही बाबसुद्धा गंभीरच नाही काय ?
आपण नेहमी ऐकतो की सरकारी खजिन्याला गळती लागली आहे आणि सर्वसामान्यांनी कररूपाने जमा केलेला पैसा टू जी, राष्ट्रकुल घोटाळा आदीतून लुटला जात आहे. एखादा मनुष्य वाहतूक पोलिसाकडे एक हजाराचा दंड भरण्याऐवजी शंभर रुपयाची लाच देतो, एखादा रेल्वे प्रवासी आपली जागा आरक्षित करण्यासाठी तिकिट तपातणीसाला लाच देतो, काही पालक मुलाला अभियांत्रिकी, मेडिकल कॉलेजात प्रवेश मिळविण्यासाठी डोनेशन भरतात. या सा-या गोष्टी भ्रष्टाचारात मोडत नाहीत की काय ? कदाचित या भ्रष्टाचाराची चर्चा होत नसेल, हा भ्रष्टाचार कमी रकमेचा असेल, परंतु यामागची भावना स्वार्थाचीच असते ना ?
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
No comments:
Post a Comment