अलेक्स हॅलेची कादंबरी परवा पुन्हा लख्ख आठवली. 'रूट्स'. आपल्या मुळांचा शोध घेत हॅले अमेरिकेत गुलाम म्हणून आणलेल्या आपल्या अफ्रिकन पूर्वजांची पाळं मुळं शोधून काढतात. अक्षरश: खिळवून ठेवते ही कादंबरी. मुळांशी घट्ट बांधलेलं असणं हा मानवी स्वभाव असेल कदाचित; पण ज्यूंच्या बाबतीत हे बंध इतरांहून खूप घट्ट आहेत.