Pages

Saturday, July 14, 2012

परमेश्वराचा क्रोध!

गिरीश कुबेर - शनिवार, ३० जून २०१२
girish.kuber@expressindia.com
देशाच्या इभ्रतीवरच घाला पडल्यानंतर त्याला इस्रायलसारखे राष्ट्र कशा पद्धतीने सामोरे जाते त्याचे हे कथानक तितकेच रोमांचकारी असणे स्वाभाविकच आहे.  लेखकाची अकृत्रिम शैली किंवा त्या कथानकातील नाटय़ आपल्याला जितके भावते तितकेच या खऱ्या इतिहासातील पात्रांचा राष्ट्राभिमान अधिक ठसतो. अशावेळी आपल्याकडच्या यासारख्याच घटनांना आपण कसा प्रतिसाद देत असतो त्याची बोच लागल्यावाचून राहत नाही.

अब्दुस सलाम

गॉड पार्टिकलच्या संशोधनात जसा भारताच्या सत्येंद्रनाथ बोस यांचा वाटा होता तसेच आपल्या शेजारच्या देशातील म्हणजे पाकिस्तानातील अब्दुस सलाम या काहीशा न ऐकलेल्या वैज्ञानिकाचाही मोठा सहभाग होता. या कणाची क्रिया काय असू शकते, हे सांगणाऱ्या ‘इलेक्ट्रोवीक थिअरी’तील कामाबद्दल  १९७९ चे नोबेल पारितोषिक सलाम यांना मिळाले. मात्र, ते अहमदिया पंथात जन्माला आल्यामुळे पाकिस्तानातील लोक त्यांना खरे मुस्लिम मानण्यास तयार नाहीत.