गिरीश कुबेर - शनिवार, ३० जून २०१२
girish.kuber@expressindia.com
देशाच्या इभ्रतीवरच घाला पडल्यानंतर त्याला इस्रायलसारखे राष्ट्र कशा
पद्धतीने सामोरे जाते त्याचे हे कथानक तितकेच रोमांचकारी असणे स्वाभाविकच
आहे. लेखकाची अकृत्रिम शैली किंवा त्या कथानकातील नाटय़ आपल्याला जितके
भावते तितकेच या खऱ्या इतिहासातील पात्रांचा राष्ट्राभिमान अधिक ठसतो.
अशावेळी आपल्याकडच्या यासारख्याच घटनांना आपण कसा प्रतिसाद देत असतो त्याची
बोच लागल्यावाचून राहत नाही.
girish.kuber@expressindia.com