Pages
▼
Tuesday, May 28, 2013
धर्मांतर आणि मातंग समाज
दैनिक दिव्य मराठीत (दि. 25 एप्रिल) ओबीसींच्या धर्मांतराबाबत अँड. डी. आर. शेळके यांचे विवेचन विचारप्रवर्तक आहे. सामाजिक परिवर्तनाचा अभाव सर्वच जातीत आढळतो. मी मातंग समाजातील असून माझा धर्मांतराबाबतचा अनुभव असा आहे- पाच वर्षांपूर्वी मातंग समाजातही हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मात प्रवेश करण्याचा विचारप्रवाह सुरू झाला होता.
गोहत्येविरोधात भिक्खूचे आत्मदहन
मटा ऑनालाइन वृत्त । कॅण्डी
श्रीलंकेतील एका बौध्द भिक्खूने गो हत्येचा विरोध करण्यासाठी स्वत:ला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भिक्खूची प्रकृती चिंताजनक असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कॅण्डी शहरातील सेंट्रल टाऊन परिसरात असलेल्या बुध्द विहाराजवळ ही घटना घडली. जेथे गौतम बुध्दांच्या दाताचे अवशेष ठेवले आहेत त्याच मंदीरासमोर बुध्द जयंतीच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.