सोलापूर | विवेकानंद केंद्राच्या वतीने
त्र्यंबकेश्वरजवळ (जि. नाशिक) पिंपळद येथे १६ मे ते ३० मे २०१४ या
कालावधीत निवासी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्र्यंबकपासून तीन
किलोमीटरवर सह्याद्री डोंगररांगांच्या कुशीत रम्य परिसरात विवेकानंद
केंद्राचे प्रशिक्षण केंद्र आहे. त्या ठिकाणी रोज सकाळी ६ ते रात्री ९.३०
या वेळेत विविध सत्रांचे आयोजन असेल.