Pages

Wednesday, December 16, 2015

विवेकानंद केंद्रातर्फे गुरुवारी पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णींचे व्याख्यान

सोलापूर । विवेकानंद केंद्राच्या पर्यावरण मंडळातर्फे गुरुवारी (१७ डिसेंबर) सायंकाळी साडेसहा वाजता प्रसिद्ध पर्यारवणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. विवेकांनद केंद्र, १६५ रेल्वे लाइन्स येथे “कचरा निर्मूलन आणि नागरिकांची जबाबदारी’ या विषयावर व्याख्यान होईल, अशी माहिती मंडळाचे प्रमुख अजित ओक यांनी िदली. अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त विजयकुमार काळम पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे सीइओ अरुण डोंगरे उपस्थित असतील. व्याख्यानानंतर कचरा िनर्मूलन आणि नागरिकांचा सहभाग यावर चर्चा होईल.

कुलकर्णी यांचे जीवन पर्यावरण रक्षण आणि सवंर्धनासाठी समर्पित आहे. निसर्गायन, हसरे पर्यावरण, दैनंदिन जीवनात पर्यावरण, वैदिक गणित, जगदीशचंद्र बोस यांचे चरित्र, अणुविवेक, सॅफ्राॅन थिंकिंग अॅण्ड ग्रीन लिव्हिंग अशी अनेक लोकप्रिय पुस्तके त्यांनी लिहिली. काही वर्षे केंद्राचे जीवनव्रती, त्यानंतर विवेक विचारचे संपादक म्हणून त्यांनी कार्य केले आहे. सध्या ते गतिमान संतुलन या पर्यावरण नियतकालिकाचे संपादक आहेत.
गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत विवेकानंद केंद्र पर्यावरण मंडळाने शहराच्या विविध भागात ७०० हून अधिक िठकाणी जलपुनर्भरणाचे काम केले आहे. आज शहरात व िजल्ह्यात कचऱ्याची समस्या आहे. त्याचे समूळ नायनाट करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी शहरात स्वच्छतेचे कार्य हाती घेण्यात येत आहे. स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचे ध्येय गाठण्यासाठी प्रबोधनाच्या मार्गावरुन जाणे योग्य आहे. त्यासाठी संपूर्ण हयात पर्यावरण रक्षण आणि सवंर्धनासाठी खर्ची घातलेले दिलीप कुलकर्णी यांचे व्याख्यान आयोजिल्याचे ओक यांनी म्हटले. या व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी शहरवासियांना केले.

No comments:

Post a Comment