सोलापूर । विवेकानंद केंद्राच्या पर्यावरण मंडळातर्फे गुरुवारी
(१७ डिसेंबर) सायंकाळी साडेसहा वाजता प्रसिद्ध पर्यारवणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी
यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. विवेकांनद केंद्र, १६५ रेल्वे लाइन्स येथे “कचरा
निर्मूलन आणि नागरिकांची जबाबदारी’ या विषयावर व्याख्यान होईल, अशी माहिती मंडळाचे
प्रमुख अजित ओक यांनी िदली. अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त विजयकुमार काळम पाटील तर
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे सीइओ अरुण डोंगरे उपस्थित असतील.
व्याख्यानानंतर कचरा िनर्मूलन आणि नागरिकांचा सहभाग यावर चर्चा होईल.