Wednesday, August 24, 2011

इमामाचा देशद्रोही फतवा

शाही इमाम बुखारी यांनी अण्णांच्या आंदोलनाच्या संदर्भात एक फतवा काढला आहे. अण्णांचे आंदोलन इस्लामविरोधी असल्याने या आंदोलनात मुस्लिमांनी भाग घेऊ नये, असे या फतव्यात म्हटले आहे. या फतव्यामध्ये अण्णांच्या आंदोलनाला इस्लामविरोधी ठरविण्यासाठी इमामाने जे कारण दिले आहे ते संताप आणणारे, कीव करण्यासारखे आहे. अण्णांच्या आंदोलनात 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्' अशा घोषणा दिल्या जात असल्याने हे आंदोलन इस्लामविरोधी असल्याची बांग शाही इमामाने दिली आहे. या देशातील कोणत्याही देशभक्त माणसाच्या संतापाचा भडका उडावा, असा हा फतवा आहे. भारत माता की जय याला जर यांचा विरोध असेल, तर यांना सडेतोडपणे सांगावे लागेल की अरे भारत माता की जय ही या देशाच्या राष्ट्रगीताचा भाग असणारी घोषणा आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनात देशातील सामान्यातला सामान्य माणूस जात, पात, पंथ सर्व विसरून देशभक्तीच्या भावनेने सहभागी झाला आहे. अशावेळी देशाच्या जयजयकाराच्या विरोधात इमामाने फूत्कार टाकणे हे संताप आणणारे आहे. लांगूलचालनाचा परिणाम राष्ट्रद्रोहाकडे कसा घेऊन जातो याचे हे मूर्तिमंत उदाहरण म्हटले पाहिजे. मात्र, इमामाच्या या फतव्याला मुस्लिम समाजातीलच काही लोकांनी धुडकावून लावले, हे बरे झाले. मुस्लिमांच्या उलेमा कौन्सिलने इमामाच्या फतव्याला कडाडून विरोध केला आहे. अण्णांच्या आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील लोक सहभागी झालेले असून, इमामांचा फतवा चुकीचा आहे, असे या उलेमा कौन्सिलने म्हटले आहे. उलेमा कौन्सिलच्या या मतापाठोपाठ दोन हजार मुस्लिमांनी जनता दलाचे खासदार अली अन्वर यांच्या नेतृत्वाखाली मुद्दाम नॉर्थ एव्हेन्यू पासून रामलीला मैदानापर्यंत मोर्चा काढून अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देत रामलीला मैदानावर आंदोलनात सहभागी होण्याची कृती केली. इस्लामचा चुकीचा अर्थ काढून कोणी मुस्लिमांना गुमराह करत असतील, तर यापुढे या देशात हे चालणार नाही, हेच या मुस्लिमांनी जणू निक्षून जतावले आहे. सगळे मुस्लिम हे आपल्या हातात आहेत, अशा आविर्भावात त्यांच्या आधारे देशद्रोहाच्या टोकाला जाऊन वाटमारी करण्याचा धंदा यापुढे चालणार नाही, असा देशद्रोही धर्मांधांना हा इशारा आहे. यात आणखी एक शंका येते आहे ती कुजक्या राजकारणी, कॉंग्रेसी कारस्थानाची. अण्णांच्या आंदोलनात विक्षेप आणण्यासाठी ही मंडळी मुस्लिम, दलित यांना भडकावून देण्याचे कपटकारस्थान करण्याच्या मागे आहेत की काय? काही दलित संघटनांनी विनाकारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत अण्णांच्या आंदोलनाच्या विरोधात निदर्शने करण्याचा प्रयत्न केला होता. हा फार्स प्रायोजित असण्याची शक्यता होती. त्याच मालिकेत शाही इमामाचा हा फतवाही अण्णांचे आंदोलन ज्यांना सोयीचे नाही, त्या राजकीय नतद्रष्ट लोकांकडून प्रायोजित असू शकतो. या देशात अल्पसंख्यकांचे विषय संवेदनशील बनवून त्या आधारे भडका उडवून द्यायचा आणि त्या धगीवर राजकीय पोळ्या भाजण्याचा धंदा खूप आधीपासून चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे कारस्थान खेळले जात आहे. घटना हा दलित समाजाच्या श्रद्धेचा भाग बनवायचा आणि नको तेव्हा त्या श्रद्धेला आवाहन करून कामाला लावायचे, असा यांचा धंदा आहे. वास्तविक या देशात आजवर कपट कारस्थान करणार्‍या याच लोकांनी राजकीय खुर्ची वाचविण्यासाठी देशाची घटना गुंडाळून आणिबाणी आणली, अनेकदा सोयीनुसार घटनादुरुस्त्या केल्या. कितीतरी वेळा घटनेची पायमल्ली केली आणि आता केवळ अण्णांचे आंदोलन पराभूत करण्यासाठी हे दलित अस्मितेचे कार्ड खेळण्याचा सवंग डाव आखला गेला. अल्पसंख्यकांना भडकवून अण्णांच्या आंदोलनाला अपशकून करण्याचे कारस्थानही या लोकांनी केले असावे. शाही इमामांनी केवळ वंदे मातरम्, भारत माता की जय या घोषणांना विरोध नोंदवून गप्प बसायला हवे होते. तसे न करता इमामांनी, 'मुस्लिम समाजातील लोकांनी अण्णांच्या आंदोलनात भाग घेऊ नये' असे केलेले आवाहन वेगळीच शंका उत्पन्न करणारे आहे. शाही इमामांचा रोख वंदे मातरम्, भारत माता की जय यावर नाही. या दोन घोषणांचा हवाला देत इस्लामी समाजाला या आंदोलनापासून तोडण्याचे हे कारस्थान आहे, असे वाटू लागले आहे. ख्रिश्‍चन संघटनांनी मोर्चा काढून अण्णांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केल्याचे वृत्तही आले आहे. वास्तविक अण्णांचे आंदोलन सर्व जात, पंथ, भाषा यापासून मुक्त आहे. देशाच्या कानाकोपर्‍यातून सर्व जाती-पंथाचे लोक या आंदोलनात उतरले आहेत. अशावेळी केवळ ख्रिश्‍चन समाजाने वेगळा मोर्चा काढण्याची काही गरज नाही. भ्रष्टाचार हा एक दुर्गुण आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन या सर्वांनाच भ्रष्टाचाराचा त्रास होतो. या देशातून भ्रष्टाचार हद्दपार व्हावा, ही सगळ्यांचीच तीव्र इच्छा आहे. सर्वांनी मिळून लढा दिला तरच तो यशस्वी होईल. त्यातून वेगळी चूल मांडण्याची गरज नाही. अण्णांचे आंदोलन सुरू होण्यापूर्वी रा. स्व. संघाच्या मंगलोरजवळ पुत्तूर येथे झालेल्या बैठकीत भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाचा ठराव मंजूर झाला. त्यानंतर अण्णांचे आंदोलन सुरू झाले. त्याचाही दुरुपयोग करत अण्णांचे आंदोलन हे संघाचे कारस्थान आहे, अशा घाणेरड्या पातळीवर कॉंग्रेसच्या मंडळींनी कुप्रचार सुरू केला होता. आता तसे होऊ नये म्हणून संघाने अत्यंत संयमाने खबरदारी घेतलेली दिसते आहे. अण्णांचे आंदोलन बदनाम करण्याचा तो हुकमी मार्ग बंद झाल्याने इस्लाम, दलित या समाजघटकांना उत्तेजित करून, भडकवून देऊन हे आंदोलन हाणून पाडण्याची एक घाणेरडी खेळी आहे की काय? कोणी कसलीही खेळी करोत की राजकारण करोत आता यापुढे या देशात वंदे मातरम् आणि भारत माता की जय या घोषणांना, राष्ट्रगीतांना केलेला विरोध सहन केला जाणार नाही, हे निक्षून सांगण्याची वेळ आली आहे. ज्यांना वंदे मातरम् आणि भारत माता की जय मान्य नसेल त्यांना या देशाच्या भूमीवर एक क्षणभरही राहण्याचा अधिकार नाही, हे आता कोणताही संदेह मनात न ठेवता अगदी स्पष्टपणे सांगितले पाहिजे. देशद्रोहाची भावना भडकवून देऊन आपले राजकीय स्वार्थ साधण्याचा आगीशी खेळ कोणी करत असेल, तर त्यांनाही कायमचा धडा देण्याची वेळ आता आली आहे. मुस्लिम, दलित समाजातील विचारी लोकांनीच त्या त्या वेळी पुढे येऊन मूळ राष्ट्रीय प्रवाहापासून त्यांना भडकवून देऊन तोडण्याचे जे कारस्थान खेळले जाते, ते हाणून पाडले पाहिजे. हे लांगूलचालनाचे, हे अस्मिता भडकवण्याचे, हे देशद्रोही सौदा करण्याचे प्रकार करण्याचा विचारही मनात येणार नाही, अशी शिक्षा अशा प्रकारचा खेळ करणार्‍या कुटिल लोकांना भारतातील सामान्य लोकांनी दिली पाहिजे. यापूर्वी लांगूलचालनाच्या असल्या घाणेरड्या प्रयोगांमुळेच स्वातंत्र्याच्या चळवळीत कॉंग्रेसच्या अधिवेशनात संपूर्ण वंदे मातरम् म्हणण्यास तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्षाने विरोध केला. त्याला न जुमानता विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी वंदे मातरम् गायिले. कॉंग्रेस अध्यक्ष मंचावरून निघून गेले. त्याचवेळी त्यांना अडवून, जर तुम्हाला वंदे मातरम् मान्य नसेल तर स्वातंत्र्याच्या चळवळीत तुम्हाला काडीचे स्थान नाही, असे म. गांधींसारख्यांनी सांगितले असते तर पुढे कदाचित देशाची दुर्दैवी फाळणी झालीच नसती. आता तरी त्या चुका पुन्हा होता कामा नयेत. शाही इमामाने कोणत्याही हेतूने केलेले असेना, पण त्यांचा फतवा हा सरळ सरळ देशद्रोहाचे आवाहन करणारा असल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटला भरण्याची गरज आहे.

( साभार : तरुण भारत )

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी